अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या मदतीला पवईतील तरुणी सरसावल्या

निराधारांच्या मदतीला पवईतील तरुणी सरसावल्या

@सुषमा चव्हाण: पूर्वी फक्त चूल आणि मूल यात अडकून पडलेली तरुणी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. कोरोना व्हायरसने आता देशभर हाहाःकार माजवलेला असतानाच लॉकडाऊन स्थितीत अनेक तरुण गरीब गरजूंच्या मदतीला आणि अविरत सेवा पुरवणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीला पुढे आलेले असतानाच आता पवईतील तरुणी सुद्धा यात मोठा सहभाग नोंदवत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे दहशत असतानाच रस्त्यावर आपल्या सुरक्षेसाठी निधड्या छातीने अविरत उभे असणाऱ्या मुंबई पोलीस आणि निराधार लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पवईतील सोनल मकवाना, मनीषा मकवाना, रोहिणी देठे, दीपा नाडार, हर्षा पवार, सुनिता सावखंडे, लक्ष्मी कांबळे, वैष्णवी पवार या पवईतील तरुणी पुढे सरसावल्या आहेत. यात सचिन डावरे या तरुणाने सुद्धा सहभाग घेतला.

निराधारांच्या मदतीला पवईतील तरुणी सरसावल्या

यावेळी या तरुणींकडून पवई आणि चांदिवली भागात निराधार असणाऱ्या लोकांसोबतच, रस्त्यांवर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भोजन देण्यात आले. तसेच पोलिसांच्या या सेवेसाठी नागरिकांच्यावतीने आभार सुद्धा मानण्यात आले. एवढ्यावरतीच न थांबता या तरुणींकडून रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या जनावरांना सुद्धा खायला देण्यात आले.

“अनेक निराधार सध्या लॉकडाऊनमुळे उपाशी राहत आहेत. या काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शिवाय या गोंधळात अनेक भटक्या जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत. उन्हाच्या तडाख्यात पोटात अन्न नसल्याने अंगातील त्राण संपल्याने ते कुठेतरी सावलीत पडून राहतात. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून अशा जनावरांना सुद्धा आम्ही उपाशी राहू न देण्याचा निश्चय करत खायला दिले आहे” असे याबाबत बोलताना या तरुणींनी सांगितले.

इथेच थांबणार नसून, वेळोवेळी गरज पडेल तेव्हा आम्ही हे कार्य करत राहणार आहोत असेही यावेळी आवर्तन पवईशी बोलताना तरुणींनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!