साकीनाका येथे लपून असणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक; अँटी-टेरर सेलची कारवाई

साकीनाका अटक आरोपी प्रातिनिधिक छायाचित्र

साकीनाका पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाने (एटीसी) आठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या मार्गाने देशात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशातील तीन बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे. पाठीमागील ८ वर्षापासून ते साकीनाका येथे वास्तव्यास आहेत.

मुनीर शेख (वय ४४) सैफुल मुस्लिम (वय २७) आणि अब्दुल हलीम (वय ३२) वर्षे हे भारतीय नागरिक असल्याचे सांगत या भागात राहत होते. या प्रकरणाच्या सखोल पोलिस तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की, ते बांगलादेशातील त्यांच्या कुटुंबियांना इंटरनेट कॉल करत असत. यासाठी ‘इन माय ओपिनियन’ या सामाजिक माध्यमाचा ते वापर करीत होते.

तपास पथकाने आरोपींच्या कुटुंबियांशी (त्यांच्याशी नकळत) संपर्क साधत आरोपींचे जन्म प्रमाणपत्र पाठवायला सांगितले आहे. शेख व मुस्लिम मुंबईत वेल्डर म्हणून काम करत आहेत तर हलीम साकीनाका येथे फळ विक्रेता म्हणून काम करतो.

पोलिस उपायुक्त (डीसीपी) परिमंडळ दहा अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिस विभागाच्या एटीसी व तिघांना अटक करणार्‍या पथकाने ही कारवाई केली.

अटकेबाबत बोलताना वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत म्हणाले, “असामाजिक घटक किंवा संशयास्पद व्यक्तींची शोध मोहिमे दरम्यान या तिघांना अटक करण्यात आली.” एटीसीचे अधिकारी हनुमंत धवन यांच्या नेतृत्वात पथकाने साकीनाक्यातून तिघांना पकडले.

अटकेनंतर तिघांनीही दावा केला की ते भारतीय आहेत, पण समाधानकारक उत्तरे देण्यास किंवा ओळखपत्र सादर करण्यात ते अक्षम आहेत. “ते देशात कसे घुसले याबद्दल सविस्तर चौकशी चालू आहे,” अशी माहिती याबाबत बोलताना साकीनाका पोलिसांनी दिली.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!