महिलेचा वीज बिल भरण्याचा प्रयत्न, २.३८ लाखांची फसवणूक

वीजबिल भरण्याच्या नावाखाली एका ६३ वर्षीय महिलेची २.३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईत घडली आहे. वीज बिल भरण्यास सांगणारा संदेश पाठवत रिमोट ऍक्सेस ऍप्लिकेशन वापरून सायबर चोरट्यांने हा डाव साधला आहे.

पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यानुसार, तक्रारदार महिला पवई येथे एकटीच राहत असून, व्यवसायाने वकील आहे. ती कामासाठी वांद्रे येथे जात असताना तिला तिचे थकीत वीज बिल भरण्यास सांगणारा एक संदेश प्राप्त झाला. त्यानंतर एका व्यक्तीने फोन करून तो वीजपुरवठा करणाऱ्या एका खासगी कंपनीत कर्मचारी असल्याचे भासवत तिला त्वरित ऑनलाईन बिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे सांगितले.

फसवणूक करणार्‍याने कथितपणे एनी डेस्क नामक एप डाउनलोड करण्यास सांगत वीज कनेक्शन खंडित होण्यापासून रोखण्यासाठी ११ रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले, असे तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“तक्रारदार हे खाजगी कंपनीला ११ रुपये पेमेंट करत असताना फसवणूक करणार्‍याला व्यक्तीने तिची सर्व ऍक्टिव्हिटी नोंद करत तिचे बँक तपशील कॉपी केले. काही वेळात लगेचच तिच्या बँक खात्यातून चार व्यवहारांमध्ये २.३८ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले”, असे पोलिसांनी सांगितले.

महिलेला तिच्या बँकेकडून अलर्ट प्राप्त झाले आणि तिला व्यवहारांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तिने तिच्या बँकेत कॉल केला आणि तिचे बँक खाते ब्लॉक करत पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!