पवईमध्ये बोगद्यात वर्षभरापासून अडकून पडलेली टीबीएम मशीन काढणार कशी? तज्ञांना पडला प्रश्न

मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी वेरावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगदा खोदणारी मशीन (टीबीएम) पवईजवळ बोगद्यात वर्षभरापासून अडकली आहे.

पाणी चोरी रोखणे आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून मुंबईचे जुने पुरवठा नेटवर्क सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका वेरावली ते घाटकोपर ६.६ किमी लांबीचे पाणीपुरवठा बोगदा तयार करीत आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी वेरावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगदा खोदणारी मशीन (टीबीएम) पवईजवळ बोगद्यात वर्षभरापासून अडकली आहे. वर्षभरात या मशीनला काढण्यात अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र ही मशीन काढण्यास यश मिळत नसल्याने आता ही मशीन कशी काढायची? असा प्रश्न तज्ञांना पडला आहे.

टीबीएम हे जर्मन मेक – हरेनकेनेटचे असून, त्यासाठी जर्मनीवरून तंत्रज्ञ, तज्ञ सुद्धा आले मात्र त्यांनाही यात अजून यश मिळालेले नाही.

पाणी चोरी आणि मोठ्या दबावाने पाणीपुरवठा करण्यासाठी वेरावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी १८३ कोटी रुपयांचा कंत्राट जानेवारी २०१२मध्ये देण्यात आले आहे. ४८ महिन्यांची याची मुदत होती. या संपूर्ण प्रकल्पाला दोन भागात विभागण्यात आले असून, पवई हा मध्यबिंदू आहे.

पवई ते वेरावलीपर्यंत २.२ किमीचा एक भाग पूर्ण करुन कार्यान्वित झाला आहे. मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पवई ते घाटकोपर पर्यंतच्या ४.४ किमी लांबीच्या बोगद्याच्या निर्मितीवेळी १.२ किमी बोगद्याच्या निर्मितीनंतर टीबीएम मशीन पवई येथे गाळात अडकले. त्या भागात आवश्यक परिस्थिती नसल्यामुळे ९० मीटर खोल अडकून पडलेल्या या मशीनला काढण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मातीचा स्तर वेगळा आहे

या समस्येचे स्पष्टीकरण देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहरातील इतर भागाच्या तुलनेत या ठिकाणी मातीचा स्तर वेगळा आहे. ज्या ठिकाणी टीबीएम ड्रिल करीत होते तो भाग खूपच भुसभुशीत आहे. टीबीएम जवळील पोकळीत मागील वर्षी झालेल्या पावसाच्या वेळी बोगदा भरून गेला होता. टीबीएम आता मातीने वेढली गेली आहे. पाणीपुरवठा बोगदा बनविताना अशी समस्या प्रथमच आली आहे. पायरोक्लास्टिक राख असलेली अशी माती शहरातील इतरत्र कोठेही आढळली नाही”

२.८ मीटर व्यासाची आणि ५० मीटर लांबीच्या या टीबीएम मशीनला काढण्यासाठी गेल्या वर्षभरात देशासह जगभरातील अनेक टीबीएम तज्ञांकडे संपर्क साधला आहे, मात्र सर्वच मशीन काढण्यासाठी व्यर्थ ठरले आहेत.

पुढील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी आयआयटी-मुंबई येथील प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली पालिकेने तज्ज्ञ समितीही गठित केली आहे. महापालिकेचे अधिकारी आणि तज्ज्ञ समितीच्या सदस्यांची पुढील आठवड्यात बैठक सुद्धा होणार आहे.

हा प्रकल्प २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होता. मात्र या घटनेनंतर काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला दोन मुदतवाढ देण्यात आली आहे. या घटनेमुळे या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. खर्चाचा अंदाज आता २६३ कोटींवर गेला आहे.

टीबीएम अडकून पडल्याने या प्रकल्पाला होणारी दिरंगाई आणि वाढणारा खर्चाचा विचार करता पुढे काही अंतरावर नवा शाफ्ट तयार करून काम सुरु करावे. तसेच मशीन काढण्यासाठी सुद्धा याच पर्यायाचा विचार सुरु आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!