टीव्ही पळवणाऱ्या चोराला दुसऱ्या चोरीच्या तयारीत असताना अटक

चैतन्यनगर भागातील एका घरातून टीव्ही चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. सुनुज गुलाब सरोज (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घरात आयपीएलसह इतर कार्यक्रम पाहण्यासाठी त्याने ही टीव्ही चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी पवई परिसरात घडलेल्या एका घटनेत चोरट्यांने घरात प्रवेश करत घरातील टीव्ही पळवल्याचे समोर आले होते. अनिरुद्ध चाबुकस्वार हे आपल्या एका बहिणीसोबत चैतन्यनगर येथे राहतात. १० ऑक्टोबर रोजी ते अहमदनगर येथे आपल्या मूळ गावी गेले होते. घराचे मालक यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी अनिरुद्ध यांना फोन केला असता ते गावीच असल्याचे सांगितले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पाहिले असता घराचा कडी कोयंडा उचकटून कोणीतरी घरात प्रवेश करत चोरी केल्याचे समोर आले.

घरातून केबलबिल भरण्यासाठी ठेवलेले १२०० रुपयेसह चोरट्यांनी टीव्ही पळवल्याची तक्रार अनिरुद्ध यांनी पवई पोलीस ठाण्यात दिली होती.

‘घटनेनंतर आम्ही परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना काही संशयित समोर आले होते. याच्याच आधारावर आम्ही आमच्या खबऱ्याचे जाळे कार्यरत केले होते. “संबंधित वर्णनाचा व्यक्ती परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्याच्या आधारावर सापळा रचून आम्ही सरोज याला चोरीच्या तयारीत असताना अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रवीण महामुनी यांनी सांगितले.

आरोपीच्या घरातून पोलिसांनी टीव्ही हस्तगत केली आहे. घरात आयपीएलसह इतर कार्यक्रम पाहण्यासाठी त्याने ही टीव्ही चोरी केली होती असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!