हत्याराचा धाक दाखवून लुटण्याच्या गुन्ह्यात पवईत दोघांना अटक

धंदेवाले आणि नागरिक यांच्याकडून हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. असिफ रियाज शेख (२४) आणि साहिल मेहबूब शेख (२६) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांची नावे असून, त्यांच्यावर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची यापूर्वीही नोंद आहे. अटक दोन्ही आरोपी हे तुंगा गाव पवई येथील रहिवाशी आहेत.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील तुंगागाव येथे राहणारे नागरिक सचिन कोरे हे मंगळवारी सकाळी परिसरात फिरत असताना साहिल आणि असिफ यांनी त्यांना रस्त्यात गाठून तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असणारा मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरी काढून घेतले. ज्याबाबत तक्रारदाराने पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्वरित परिसरात शोधाशोध करत पाईपलाईन भागात लपून बसलेल्या ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेतले.

भादंवि कलाम ३९४ (लूट करण्याच्या उद्देशाने इजा करणे), ३९७ (जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करून लूट करणे), ३२३ (स्व-ईच्छेने दुसऱ्याला दुखापत करणे), ५०४ (शांती भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे), ५०६ (धमकावणे), ४२७ (नुकसान करणे), ३४ (एकाच उद्देशाने एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केलेला गुन्हा) सह भारतीय हत्यार कायदा कलाम ४/२५ नुसार गुन्हा नोंद करून दोघांना अंधेरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असिफ आणि साहिल दोघांवरही परिसरात दादागिरी करणे, हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पवई पोलिसांनी अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार सुद्धा हस्तगत केले आहे.

, , , ,

One Response to हत्याराचा धाक दाखवून लुटण्याच्या गुन्ह्यात पवईत दोघांना अटक

  1. Subhash April 13, 2019 at 8:05 am #

    V good stage for powai residents citizens.
    There are trafic zam issue at Hiranandani main road is critical.All gaps in road dividers should be
    Pack.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!