पवईत दोन मोबाईल चोरांना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

वईतील हिरानंदानी भागात हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी अटक केली. चोरीच्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. मोहमद कैफ मोहमद शोएब खान (२७), निखील संदीप बोढारे (२१) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव रामकेवल प्रजापती हे सकाळी ७.१५ वाजता कामावर जाण्यासाठी हिरानंदानीतील डी-मार्टजवळ असणाऱ्या बस थांब्यावर उभे होते. यावेळी एक मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांपैकी पाठीमागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल खेचून तेथून पळ काढला होता.

फिर्यादी यांनी आरडाओरडा करताच, मोटारसायकलवरून गस्त घालत असणारे बीटमार्शल क्रमांक ४ वरील पोलीस नाईक खैरमोडे, पोलीस नाईक राठोड यांनी पाठलाग करत स्नॅचिग पॉईंटवर असणारे पोलीस शिपाई शिंदे यांच्या मदतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

‘भादवि कलम ३९२, २७९, ३४ नुसार गुन्हा नोंद करून आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

अटक दोन्ही आरोपीं रेकोर्डवरील गुन्हेगार असून, पवईसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes