पवईत गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन जण जखमी

पवईतील आयआयटी मार्केट शेजारी अतिशय दाटीवाटीचा परिसर म्हणून परिचित असणाऱ्या महात्मा फुलेनगरात आज सकाळी एका घरात गँस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत घरातील पती आणि पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. सोनी शेख (२२) आणि मोहम्मद सैय्याद कैस शेख (३६) असे जखमी दाम्पत्याचे नाव असून, त्यांच्यावर पवई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुलेनगर भागात शेख कुटुंब भाडेतत्वावर वास्तव्यास आहे. आज सकाळी गॅस सुरु असताना गॅस सिलेंडरमधून गळती होत असल्याचे सोनी शेख यांच्या निदर्शनास आले. “गडबडीत गॅस सुरु असताना गॅसचा वॉल उघडला असताना भीषण स्फोट झाला आणि दाम्पत्य गंभीर जखमी झाले.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

स्फोटाची भीषणता ऐवढी होती की घरातील पत्रे सुध्दा फुटले असून, आसपासच्या घरांना सुध्दा हादरे बसले. जखमी पती पत्नीवर सध्या पवई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, दोघेही व्यवस्थित असल्याचे पवई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

, ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!