एमडी ड्रग्जसह पवईत दोघांना अटक

वईमध्ये ग्राहकाला मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या २ तरुणांना शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. मेहंदीहसन जहीरहसन मिर्झा (२३), नरेश सुरेश माला (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मुंबईत मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रगचा सुळसुळाट वाढला असतानाच, मुंबईत एमडी पुरवणाऱ्या टोळीतील दोन इसम पवई येथे येणार असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांना मिळाली होती. ज्याच्या आधारावर सापळा रचून हिरानंदानी येथून दोघा आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली.

“हिरानंदानीतील बीटेल हॉटेलजवळ पाळत ठेवून असताना, खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या वर्णनाचे दोन इसम आम्हाला येताना दिसताच आम्ही त्यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३६ ग्राम एमडी ड्रग्ज मिळून आले”, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी सपोनि निलेश पाटील यांनी सांगितले.

ताब्यात घेतलेल्या ड्रग्जचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून, पवई पोलिसांनी दोन्ही आरोपींना कलम ८-क सह २२, २९ एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक करून कोर्टात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपींपैकी एका आरोपीवर मुंबईतील इतर पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हे नोंद असून, आम्ही त्याची अधिक माहिती घेत आहोत. अटक आरोपी या भागात तरुणांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ड्रग्ज विकण्यासाठी आले होते अशी माहिती सुद्धा समोर आली आहे, आम्ही त्या दिशेनेसुद्धा तपास करत असल्याचे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!