शाब्बास रे वाघा ! पाठलाग करून एकट्याने पकडले दोन मोबाईल चोर

पोलीस उपनिरीक्षक अनिल पठारे

मुंबई पोलिसांच्या कार्यामुळेच मुंबई पोलिसांनी स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय स्थान कमावले आहे. ते तेवढेच खरे सुद्धा असल्याची प्रचिती नुकतीच पवई परिसरात आली. आपले कर्तव्य संपवून परतत असताना दोन मोबाईल चोर चोरी करून पळत असल्याचे दिसताच पवई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पठारे यांनी कसलाच विचार न करता त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या या कार्यासाठी पठारे यांच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सध्या गणेश उत्सवाचे दिवस असून, मुंबई परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे जबाबदारीचे काम मुंबई पोलीस खूप चांगल्यारित्या सांभाळत आहेत. कोणताही गैरप्रकार घडू नये तसेच येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत. त्यातच साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेने मुंबई पोलिसांना अजूनच सतर्क केले आहे. महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.

टाळेबंदी हटल्याने नागरिक बाहेर पडत असतानाच गणेश विसर्जनामुळे बाहेर पडणाऱ्या भाविकांमुळे रस्त्यांवर लोकांची संख्या वाढली आहे. अशातच चोरट्यांचे साधले असून, त्यांनी डाव साधायला सुरुवात केली आहे.

साई प्रसाद हॉटेलमध्ये काम करणारे संदीप सिंघ राणा हे मरोळ येथे परतत असताना एनटीपीसी सिग्नल जवळ त्यांच्या जवळील एमआय कंपनीचा मोबाईल खेचून एक इसम रिक्षात बसून पळाला. याचवेळी विसर्जन बंदोबस्त करून पोलीस ठाण्याकडे परतत असताना पोलीस उपनिरीक्षक अनिल पठारे यांना सिंघ यांनी माहिती देताच त्यांनी रिक्षाचा पाठलाग करत थोड्याच अंतरावर त्या रिक्षाला रोखत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

“दोन्ही आरोपी हे पळून जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. मात्र पठारे यांनी पूर्ण शक्तीने त्यांना रोखत पोलीस मदत पोहचेपर्यंत त्यांना एकट्याने पकडून ठेवले,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नदीम सलीम शेख (१९) आणि अब्दुल लतीफ अब्दुल सत्तर खान (३५) अशी दोन्ही अटक आरोपींची नावे असून, ते मुंब्रा ठाणे परिसरात राहणारे आहेत. अटक आरोपींविरोधात अजून इतर कोणते किंवा अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का? याची पवई पोलीस माहिती मिळवत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!