वंबआ मुंबईच्या वतीने पवईत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लॉकडा्ऊन शिथिल करत अनलॉकचा दिशेने प्रवास सुरु झाला असला तरीही या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या हाताला अजूनही काम नाही आहे. असे लोक उपाशी राहू नयेत यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबईच्यावतीने सोमवारी पवई येथे मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मुंबईप्रदेश सदस्य भारत हराळे यांच्या नेतृत्वाखाली गरजू गरीब नागरिकांना हे वाटप करण्यात आले. यावेळी वार्ड क्रमांक १२२चे अध्यक्ष संतोष पंडागळे, उपाध्यक्ष प्रदिप अंभोरे, माजी वार्ड अध्यक्ष सुभाष गाडे, अरुण वानखेडे, दाभाडे, सुरेखा हराळे, कल्पना घोक्षे व मोठ्या प्रमाणात स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!