विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने सुटला लोकांच्या जेवणाचा प्रश्न

@आकाश शेलार

कोरोना वैश्विक महामारीमध्ये अनेक गरीब गरजूंना हाताला काम नाही त्यामुळे त्यांच्यासमोर परिवाराच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला असताना विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने या प्रश्नाला उत्तर शोधण्यात आले आहे. यांच्यावतीने परिसरातील लोकांना ९२ दिवस मोफत अन्नदान करण्यात आले.

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना हातावर पोट असणाऱ्या अनेकांची दररोजची कमाई बंद झाली होती. यामुळे आता आपल्या पोटाचे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. दररोजच्या कमाईवर आपले घर चालवणारे छोटे व्यावसयिक, रिक्षावाले, नाका कामगार यांच्या याच समस्येला मदतीचा हात देण्यासाठी विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळ पुढे सरसावले.

रोहित राय मित्र मंडळाचे मार्गदर्शक श्री रोहित राय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहयोगाने लॉकडाऊनमध्ये सलग ९२ दिवस चांदिवली, संघर्षनगर, साकीनाका भागात सकाळ आणि संध्याकाळ गरीब लोकांना मोफत दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच परिसरातील गरीब गरजू लोकांना १ महिन्याचे राशन किट, मास्क तथा हँड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

ह्या निस्वार्थ कार्यात रोहित राय, राज यादव, गुड्डू राय, डॉ अभिषेक राय, रोहन ठाकुर, कमलेश गुप्ता,  संदीप प्रजापति, धीरज पांडेय, धीरज विश्वकर्मा, सचिन सहानी, विक्रम यादव, अरुण वर्मा, रामा यादव, शंकर पटेल, कैलास यादव, अजय कांबळे, दीपक जैसवाल, अखिलेश विश्कर्मा यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

“पुढील काळातही आवश्यकतेनुसार सहयोग मिळाला तर अजून २ महिने हे सेवाकार्य आम्ही करु” असे याबाबत बोलताना रोहित राय यांनी म्हटले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!