ऑनलाईन साडी खरेदी करायला गेली आणि ५० हजार घालवून बसली

सध्या उत्सवाचे दिवस असून, ऑनलाईनवर खरेदीला उधान आले आहे. मात्र अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी केलेल्या ७९९ रुपयांच्या साडीसाठी रहेजाविहार येथे राहणाऱ्या एका गृहिणीला चक्क ५० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणारी गृहिणी श्रीमती गर्ग (३८) हिला काही दिवसांपूर्वी ऑनलाईन कपडे आणि साडी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर एक साडी आवडली होती. तिने त्वरित ती साडी बुक करून त्याची किंमत ७९९ रुपयाचे पेमेंट सुद्धा ऑनलाईन केले.

दिलेल्या काळात साडी पोहचली नसल्यामुळे तिने चौकशी करायला सुरुवात करत, गुगलवरून त्या संकेतस्थळाचा सेवाक्रमांक मिळवून संपर्क साधला. यावेळी फोन घेणाऱ्या व्यक्तीने आपकी ओळख तिला दीपक शर्मा अशी करून दिली.

महिलेने त्याला मी आपल्या संकेतस्थळावर एक साडी बुक केली असून, त्याचे ऑनलाईन पेमेंटदेखील केले आहे. मात्र अद्याप साडीची डिलेव्हरी झालेली नसल्याची तक्रार दिली. ‘यावेळी समोरील व्यक्तीने तक्रारदार यांना तुमची तक्रार नोंद केली आहे, तुमचे पैसे परत पाठवत आहे. मी एक लिंक पाठवत आहे त्यात माहिती भरून येणारा ओटीपी पाठवून द्या. असे महिलेला सांगितले, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार यांनी माहिती भरून आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक समोरील व्यक्तीला देताच काही वेळातच तीच्या खात्यातून २५ हजार, १५ हजार आणि १० हजार अशी ५० हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर झाली.

तक्रारदार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घडला सर्व प्रकार सांगत पवई पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पवई पोलीसांनी भादविसह माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!