एनआरआय असल्याचे सांगत महिलेला ३ लाखाचा ऑनलाईन गंडा

एनआरआय असल्याचे सांगत महिलेला ३ लाखाचा ऑनलाईन गंडासाकीनाका येथील ३२ वर्षीय महिलेला तिच्यासोबत विवाहास इच्छुक असल्याचे सांगत एका भामट्याने ३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. नीरज कपूर असे या भामट्याचे नाव असून, महिलेने वैवाहिक वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर दोघांची ओळख झाली होती. या भामट्याने आपण एनआरआय असल्याचा दावा करत तिला आपल्या जाळ्यात अडकवले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साकीनाका येथे राहणाऱ्या आणि खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या महिलेने आपल्या विवाहासाठी वैवाहिक साईटवर आपली प्रोफाईल टाकली होती. यानंतर एक महिन्याने निरज कपूर नामक तरुणाने तिच्याशी संपर्क करून तो एनआरआय असून,तिच्यासोबत विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यापूर्वी त्याने तिला भेटण्याची इच्छा सुद्धा बोलून दाखवत, तो तिला भेटायला भारतात येत असल्याचे सांगितले.

३ मार्चला तक्रारदार यांना सोनिया शर्मा नामक महिलेने फोन करून कपूर यांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर अघोषित सामान आणि अमेरिकन चलन बाळगल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. त्याला सोडण्यासाठी तिने तक्रारदार महिलेला २.९८ लाख रुपये बँक खात्यात हस्तांतरित करण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या महिलेने फोन करून अजून ६लाख रुपयांची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी दिल्ली विमानतळावर आपल्या मित्राला फोन करून शर्मा बाबत विचारले असता तिथे कोणीही सोनिया शर्मा नावाने काम करत नसल्याचे त्याने सांगितले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. “भादविआणि माहिती तंत्रद्यान कायद्यातर्गतगुन्हा नोंद करून पोलीस ठाण्याचे सायबर युनिट या प्रकरणाचा तपास करत आहे.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!