रिक्षातून जाणाऱ्या महिलेवर हल्ला करून चोरटयानी लुटले

परदेशी स्थायिक असणाऱ्या जूही आपटे यांनी मुंबई पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करून, त्यांची बहिण नेहा उपाध्याय रिक्षामधून प्रवास करत असताना रात्री ८.१० वाजता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून तिच्याजवळचा मोबाईल चोरी केला असल्याची तक्रार केली होती. याच ट्विटच्या आधारावर उपाध्याय यांचा जवाब नोंदवत पवई पोलिसांनी मारहाण आणि चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

आपटे यांनी मुंबई पोलिसांना केलेल्या ट्विटनंतर पवई पोलिस पुणेच्या रहिवाशी असणाऱ्या उपाध्याय (२७) यांच्या संपर्कात आले आणि त्यांचा जवाब नोंद करून घेतला. ज्याच्या आधारावर भादंवि कलम ३९४ (चोरी करण्याच्या उद्देशाने दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. उपाध्याय यांच्या मनगटावर झालेल्या हल्ल्यामुळे जखम झाली असून, ज्यात त्यांनी आपला किंमती मोबाईल गमावला.

याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, ‘या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मिळवण्यात आलेले आहेत.’

उपाध्याय मुंबईमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आल्या असताना हा गुन्हा घडला. त्यांच्या जवाबात म्हटले आहे, मी साकीनाकाकडून पवईकडे येण्यासाठी एक ऑटोरिक्शा घेतली. पवईतील एस एम शेट्टी शाळेच्या ग्राउंडच्या समोर असताना कोणीतरी माझ्या हातावर मारल्याने माझ्या हातातील मोबाईल खाली पडला. लगेचच मी रिक्षावाल्याला थांबवून फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तो घेऊन चोरटा पळून गेला होता.

त्या पुढे म्हणतात, मी रिक्षावाल्याला जवळच्या पोलिस स्टेशनवर नेण्यास सांगितले. त्याने मला साकीनाका पोलिस ठाण्याजवळ नेऊन सोडले. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की घटना पवई पोलिसांच्या अधिकार क्षेत्रामध्ये घडली आहे, तिकडे जाऊन तक्रार दाखल करा आणि एक पोलीस सोबत देऊन मला तिकडे पाठवण्यात आले.

पवईमध्ये रात्रीच्या वेळी हल्ला करून लुटण्याची ही पहिलीच घटना नसून, दोन आठवड्यापूर्वी पंचकुटिर पादचारी पुलावर एका विद्यार्थ्याला मारहाण करून लुटण्यात आले होते. ज्याचा गुन्हा नोंद करायला गेले असता हिरानंदानी पादचारी पुलाजवळ सुद्धा एक जेष्ठ नागरिक आणि दुसऱ्या एका व्यक्तीला मारहाण करून लुटल्याचे समोर आले होते.

आपल्या ट्विटमध्ये आपटे यांनी आरोप केला आहे की, साकीनाका पोलिस आणि पवई पोलिस “गुन्हा नोंद करण्याऐवजी, अधिकार क्षेत्राला घेऊन ढकला-ढकली करत बसले होते. या घटनेबाबत पवई पोलिसांनी सुरुवातीला अ-दखल पात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली होती.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes