जागतिक पर्यावरण दिनी पवई तलाव वाचवण्यासाठी मुंबईकर एकवटले

आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक मानाचे स्थान मिळवलेल्या पवई तलाव भागाचा पाठीमागील काही वर्षात उकिरडा आणि नाला झाला आहे. पवई परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी पवई तलावात सोडले जात असल्यामुळे त्याचा श्वास गुदमरून तो नष्ट होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. त्यात भर म्हणूनच की काय आता या भागात खोदकाम आणि बांधकामानंतर निघणारा मलबा आणून टाकला जात आहे.

पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी निसर्ग स्वास्थ्य संस्था, यंग एन्व्हायरोमेंट गृप, अभुदया – आयआयटी पवई, पवई तलाव ऑर्गनायजेशनच्या माध्यमातून ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी पवई तलाव वाचवण्यासाठी मेगा क्लीनअप ड्राइव्हचे आयोजन केले होते. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी सहभाग नोंदवला.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!