मुंबई श्रमिक कामगार संघटनेचे पवईत आंदोलन

सरकारच्या एकतर्फी आणि कामगार विरोधी धोरण आणि सुधारणा विरोधात मंगळवार पासून दोन दिवस केंद्रीय कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदला साथ म्हणून मुंबई श्रमिक संघटनेच्यावतीने आयआयटी मेन गेटजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी भांडूप विभागातून अनेक कामगार संघटनांनी यात सहभाग घेतला.

असोसिएशनने सोमवारी संयुक्तपणे दिलेल्या वक्तव्यात बंदमध्ये देशभरातून २० दशलक्ष कर्मचारी सामील होणार असल्याचे सांगण्यात आले होते. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) भांडुप केंद्राच्यावतीने मोठ्या प्रमाणात कामगारांनी रस्त्यावर उतरत कामगार वाचवा, किसान वाचवा, देश वाचवाचा नारा देश कामगार विरोधी आणि एकतर्फी धोरण अंमलात आणणाऱ्या भाजपा सरकार विरोधात आपला विरोध दर्शवला.

यावेळी संघटने तर्फे सर्व कामगारांना सामाजिक संरक्षण प्रदान करा, किमान वेतन १८ हजार रुपये करा, सहा हजार रुपये पेंशन दिले पाहिजे, चलनवाढीचा प्रतिबंध, समान कामासाठी समान मोबदला द्या, सर्व स्कीम कामगार आणि तात्पुरती कामगारांना नियमित करा, कामगार कायदे रद्द करून मालक धर्जिने लेबर कोड तयार करणे थांबवा, सार्वजनिक व सरकारी क्षेत्राचे खासगीकरण रद्द करा, सर्व असंघटीत कामगारांसाठी योग्य वेतन व सामाजिक सुरक्षा कायदा करा, महागाईवर आधारित महागाई भत्ता लागू करा

इंटक, एटक, एचएमएस, सीटू, एआईयूटीयूसी, टीयूसीसी, सेवा, एआईसीसीटीयू, एलपीएफ आणि यूटीयूसी सारख्या संघटनांनी या बंदमध्ये आपला सहभाग दर्शवला आहे.

या आंदोलनात देशभरातून शेतकरी सहभागी होत असल्याने पवईतील शेतकरी संघटनांनी सुद्धा बंदमध्ये सहभाग घेत पवईतील आयआयटी मेन गेटजवळ जेव्हीएलआरवर येत आपला निषेध नोंदवला.

, , , , , , ,

2 Responses to मुंबई श्रमिक कामगार संघटनेचे पवईत आंदोलन

  1. सागर रामभाऊ तायडे January 9, 2019 at 5:25 am #

    पवई हिरानंदानी आय आय टी परिसर गरीब श्रीमंत लोकांची मोठी वस्ती आहे.या परिसरातील बहुसंख्य इमारती बांधल्या आहेत त्यातील हिरानंदानी हे लक्षवेधी बिजनेस सेंटर आहे.परंतु या सर्व परिसरात असंघटित कामगारांची संख्या मोठी असूनही कोणीच त्यांची साधी कामगार,मजूर म्हणून नोंद घेत नाही करीत आपणास नम्र विनंती आहे की या परिसरातील घरकामगार, बांधकाम कामगार, नाका कामगार, हाऊस किपिंग ,सुरक्षा रक्षक, वाहन चालक सफाई कामगार यांना मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या आवर्तन पवई प्रचार माध्यमातून जनजागृती व्हावी ही अपेक्षा

    • आवर्तन पवई January 11, 2019 at 8:06 am #

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. जनजागृतीसाठी ‘आवर्तन पवई’ नेहमी सोबत असेल.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes