जागतिक आरोग्य दिवस: चेतनने ४२६६ पुशपिनने साकारले डॉक्टरांचे पोर्ट्रेट

जागतिक आरोग्य दिवस@सुषमा चव्हाण | ७ एप्रिल हा जगभर जागतिक आरोग्य दिवस (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. आज संपूर्ण देश कोविड -१९ सारख्या महाभयंकर आजाराशी लढत असताना, यात अतिमहत्त्वाचा भाग असणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टरांना मानवंदना देण्यासाठी पवईकर मोझेक आर्टीस्ट चेतन राऊत याने पुशपिनच्या साहाय्यातून डॉक्टरांचे पोर्ट्रेट साकारत जागतिक आरोग्य दिनी त्यांचे आभार मानले आहेत.

जगात कोरोनाच्या विषाणूमुळे फैलावणाऱ्या कोविड – १९ या आजाराने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावत असताना, अशा कठीण परिस्थितीतही हजारो डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राण पणाला लावून लढत आहेत. अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या विषाणूनी आपल्या कवेत घेतले आहे. अनेक परिचारिका आणि कर्मचारी सुद्धा यामुळे बाधित झाल्याचे समोर येत आहे.

या कठीण प्रसंगी काम करणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच त्याने आभार व्यक्त करण्यासाठी चेतन राऊत याने ६ रंगछटा असलेल्या ४२६६ पुशपिनचा वापर करून महिला डॉक्टरचे पोर्ट्रेट साकारलेले आहे. २४ इंच रुंद व ३० इंच उंच असे हे पोर्ट्रेट आहे.

यापूर्वी एवढ्या कठीण समयी कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य आणि समाज हितार्थ घेतलेले निर्णय. तसेच रतन टाटा आणि खिलाडी अक्षय कुमार याने दिलेला मदतीचा हात पाहता त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत चेतनने त्यांची पोर्ट्रेट साकारली आहेत.

जागतिक आरोग्य दिवस

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४७ रोजी झाली होती. १९२ देशांचा सहभाग असणारी युनोची ही विशेष शाखा आहे. लोकांच्या आरोग्यविषयक समस्येचे निरसन करणे संघटनेचा प्रमुख हेतू आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, त्यांना आरोग्यविषयक वैद्यकीय मदत पुरवणे आदी कामे केली जातात. ७ एप्रिल हा या संघटनेचा स्थापना  दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.

“ह्या वर्षी आपणास सर्वांना माहिती आहे की कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. भारतासह संपूर्ण विश्व या आजाराने त्रस्त आहे. संपूर्ण देश या आजाराशी लढत असून, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. एक वैश्र्विक महामारी म्हणून घोषित केलेल्या कोरोना आजारात या व्हायरसची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला लागत आहे. याच्या संक्रमणाला रोखण्यासाठी आणि आपल्या बचावासाठी घरातच राहून आपण साथ देवूया” असे आवाहन यावेळी बोलताना चेतनकडून करण्यात आले आहे.

English Summary

World Health Day: Mosaic Artist Chetan Raut Made a Portrait of a Doctor with 4266 Pushpins

April 7, 2020, is celebrated globally as ‘World Health Day’. As the whole world is fighting against the deadly COVID – 19, with medical professionals being on the frontlines of this pandemic. Mosaic artist Chetan took this opportunity to honour our medical professionals by creating a portrait of a female doctor using pushpins, on the occasion of the ‘World Health Day’.

Thousands of doctors, nurses and health department staff are fighting with this virus and the struggle to contain the virus has remained a challenge, with the medical professionals also being at risk of being exposed to the coronavirus.

Chetan Raut created a portrait of a female doctor using 4266 pushpins comprising of six colours, to express his gratitude to the health workers working in these testing times. This portrait is 2 inches wide and 3 inches high.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!