तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात; माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान आवश्यक

माहिती अधिकार अधिनियम कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी महत्वाचा नागरिकाभिमुख कायदा आहे. तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात. पारदर्शकता, उत्तरदायित्व यासाठी या कायद्याच्या संकल्पना व कार्यपद्धतीबाबत कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवशक आहे.


माहिती अधिकार अधिनियम कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी महत्वाचा नागरिकाभिमुख कायदा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व यासाठी या कायद्याच्या संकल्पना व कार्यपद्धतीबाबत कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवशक आहे. असे प्रतिपादन या संदर्भात माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी शनिवारी केले. एसएम शेट्टी शाळा येथे ‘पब्लिक कन्सर्न फॉर गवर्नंस ट्रस्ट’ (पिसीजीटी) तर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.
पवई, चांदिवली परिसरात राहणाऱ्या लोकांना माहिती अधिकार कायदा आणि तो कसा वापरावा याबाबत हिरानंदानी पवई येथील एसएम शेट्टी इंटरनॅशनल स्कूल सभागृहात पिसीजीटीतर्फे “माहिती अधिकार कायदा” या विषयावर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी यावेळी उपस्थितांना कायद्याचे ज्ञान देताना त्यांना हा कायदा कसा वापरावा याचे मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
माहिती अधिकार कायद्याचा इतिहास, स्वरूप, उद्दीष्ट, व्याप्ती व कायद्यातील महत्त्वाच्या संकल्पना समुचित सरकार व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या, स्वयंप्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
माहिती मागविण्यासाठी अर्ज करणे, अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया, माहिती प्रकट करण्याचे अपवाद, अंशत: द्यावयाची व त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करण्याची कार्यपद्धती, माहिती आयुक्त – अधिकार, कार्य व कर्तव्य, प्रथम व द्वितिय अपील, माहिती, वैयक्तिक माहिती, जनहित व त्रयस्थ पक्ष या संदर्भातील महत्त्वाचे मार्गदर्शन यावेळी गांधी यांनी केले.

तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात. माहितीचा अधिकार हा सर्वात वरती आहे, कोणताही कायदा याच्यावर दबाव बनवत नाही. काही माहिती वगळता सर्व माहिती मिळवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कोणती माहिती मिळणार नाही याचा सुद्धा कायद्यात उल्लेख आहे तो व्यवस्थित अभ्यासला की तुम्हाला नक्की काय माहिती आणि कुठून मिळेल हे सहज समजते. मला माहितीचा अधिकार आहे हे आपण विसरता कामा नये, मात्र हा अधिकार वापरताना त्याचे योग्य ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. असेही यावेळी बोलताना गांधी म्हणाले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes