युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम

गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी ३०० पेक्षा जास्त मुलांनी सहभाग नोंदवून, पवई तलाव आणि मिठी नदीच्या पात्रातून निघालेल्या मातीच्या साहय्याने गणेशमूर्ती स्वयंनिर्मितीचा आनंद घेतला. आम्ही स्वतः पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणार असून, जास्तीत जास्त लोकांनी अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांनी केले.

टिळकांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी मातीच्या गणेशाची स्थापना करत गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, परंतु बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. पीओपी व रासायनिक रंगाने रंगविलेल्या मूर्तीची स्थापना करण्यापासून विसर्जनापर्यंत अनेक मार्गाने निसर्गाशी खेळ केला जात आहे. पवई तलावात प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. निसर्ग नियमाच्या बाहेर जाऊन साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामुळे पवई तलावाचा सुद्धा नाश होत चालला आहे.

“पर्यावरणाचा होणारा नाश रोखण्यासाठी यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्ट नियमित जनजागृतीचे कार्य करत आहे. पवई तलाव आणि मिठी नदीच्या पात्रातून निघणाऱ्या मातीपासून गणेशमूर्ती बनवून ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करून, पुन्हा त्या मूर्ती आपल्या नैसर्गिक सानिध्यात विसर्जित केल्या जात आहेत,” असे याबाबत बोलताना यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टच्या सर्वेसर्वा एल्सी गॅब्रिएल यांनी सांगितले.

यावेळी संस्थेतर्फे तुम्ही गणेशोत्सवात काय करू शकता? याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.

आपला कार्बन फूटप्रिंट लक्षात घ्या, ऊर्जा वापर कमी करा

जेव्हा आपण विसर्जनासाठी जाऊ तेव्हा कार घरीच ठेवून, जलसाठ्याजवळील हवामान बदलाचे परिणाम कमी करा. घरी आपल्या उर्जा वापराबद्दल जागरूक रहा आणि सणांच्या हंगामात कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइटिंग डेकोरेशन टाळा.

प्लास्टिक उत्पादने कमी वापरा

प्लॅस्टिकच्या सजावटी जलसाठ्यात गेल्याने दरवर्षी हजारो जलचर जनजीवन विस्कळीत होत मरतात आणि त्यांचा नाश होतो. प्रभाव मर्यादित करण्यासाठी नष्ट न होणाऱ्या वस्तू परत आणण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य कचरा पिशवी घेऊन जा. धातूच्या पाण्याच्या बाटल्या वापरा, नॉन-डिस्पोजेबल कंटेनरमध्ये अन्न साठवा, खरेदीला जाताना कपड्याची किंवा पुन्हा वापरण्यायोग्य पिशवी घेवून जा.

बीचची काळजी घेण्यात मदत करा

आपण डायव्हिंग, सर्फिंग किंवा समुद्रकाठ आरामशीर बसण्याचा आनंद घेतल्यानंतर स्वतः स्वच्छ करा. जलचर किंवा समुद्र सौंदर्यायात हस्तक्षेप आनंद घ्या. इतरांना सागरी वातावरणाचा आदर करण्यासाठी स्वच्छतेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!