ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पद्मश्री मुझफ्फर हुसेन प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह केंद्र शासनाच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  २००२ साली हुसेन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d