Tag Archives | आवर्तन पवई

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

  एका १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पवईतील महात्मा फुलेनगरात घडली. पूजा सिद्धार्थ भदरगे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव असून, ती कॉम्पुटर शिक्षण घेत होती. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. पूजा ही आपल्या आईवडील व भावंडांसोबत पवईतील फुलेनगरमध्ये राहते. सोमवारी दुपारी […]

Continue Reading 0
markant-lila-final

आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा

भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे. […]

Continue Reading 0
1

महेश गौडाच्या न्यायासाठी स्थानिकांचा मूक कॅंडल मार्च

विसर्जन काळात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या महेशच्या मृत्यूस सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्था जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन मंगळवारी रात्री पवईतील नागरिकांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. बुधवारी प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली मागणी ठेवली. रविवारी गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या महेश […]

Continue Reading 0
mahesh-fin-pix

पवई तलावात बुडालेल्या तरुणास गणेश विसर्जनास बंदी केल्याचा समाजसेवी संस्थेचा दावा

पवई तलावात विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण पवईवर शोककळा पसरलेली असतानाच, गणेश विसर्जनाचे काम पाहणाऱ्या ‘पवई नागरिक सेवा संस्था’ या समाजसेवी संस्थेने महेश यास पोहता येत नसल्याने विसर्जनाच्या कामास मनाई केली होती असा दावा केला आहे. या घटनेने  सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न गणेश विसर्जनाच्या कामकाजावर उपस्थित झाला असून, याची नक्की जबाबदारी कोणाची? […]

Continue Reading 0
mahesh-fin-pix

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू

गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (रविवारी) पवईत घडली. महेश गौड (२४) असे या तरुणाचे नाव असून, तो स्वतः लाइफ गार्ड म्हणून विसर्जन काळात काम पाहतो. रविवारी सात दिवसाच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचे विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर सुरु होते. अशाच एका सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती रात्री ११.५० […]

Continue Reading 3
a

पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा भाग २

कला विकास मंडळ, तिरंदाज पवई बाल मित्र मंडळ, सैगलवाडी पवई पवई विकास मंडळ, पवईचा महाराजा, आयआयटी पवई किंगस्टार मित्र मंडळ, पवई नवसृष्टी युवा मंडळ, चैतन्यनगर पवई

Continue Reading 0
visarjan

दिड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप

ढोल – ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला…. या जयघोषात मंगळवारी दिड-दिवसाच्या गणरायाला पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणेश भक्तांनी विसर्जन करून निरोप दिला. मुंबईमध्ये गणपती बसवणार्‍यांमध्ये दिड दिवसाच्या गणपतींचे प्रमाण अधिक असते. यंदाही अनेकांनी नवसपूर्ती व परंपरा पाळत गणरायाची चतुर्थीला प्रतिष्ठापणा केली आहे. मंगळवारी पवई, […]

Continue Reading 0
fulenagar putla renovation

फुलेनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाचा शुभारंभ

@रविराज शिंदे महात्मा फुलेनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नवरंग क्रीडा मंडळाच्या पाठपुराव्यामुळे अखेर याला चालना मिळाली असून, स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून गेल्या आठवड्यात पुतळा परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला. येथील स्थानिक व रिपाइं मुंबई संघटक दिलीप हजारे यांच्या हस्ते १९९३ साली डॉ बाबासाहेब […]

Continue Reading 0
road work

खड्डेमय पवईची वाहतूक पोलिसांकडून डागडुजी

@ रविराज शिंदे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला वाहतूक कोंडीने ग्रासले असतानाच या मार्गावर असणाऱ्या खड्यांनी त्यात आणखी भर घातली होती. एमएमआरडीए, पालिका व स्थानिक प्रतिनिधी यांना तक्रारी जावून सुद्धा त्यांनी याकडे कानाडोळा केल्याने अखेर गुरुवारी पावसाच्या उघडीपीची संधी साधत साकीनाका वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. या कार्यातून त्यांनी स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाला […]

Continue Reading 0
c

नदी संवर्धन संचालनालयाने पवई तलाव प्रदूषणाचा मागवला अहवाल

पर्यावरण सचिव व पालिका अतिरिक्त आयुक्तांना नदी संवर्धन संचालनालयाने दिला आदेश पवई तलावाच्या प्रदूषणाची केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने गंभीर दखल घेत, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने याबाबतचा अहवाल मागवला आहे. राज्य पर्यावरण खात्याचे सचिव व मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांना पवई तलावात किती प्रदूषण झाले आहे? त्यावर काय कारवाई करण्यात आली? याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश […]

Continue Reading 0
Security-wall-IIT

आयआयटीत संरक्षक भिंत कोसळली

रविराज शिंदे सलग सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पवईतील चैतन्यनगरमध्ये गेल्या आठवड्यात दरड कोसळून २ जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याच्या लगतच असणाऱ्या इंदिरानगर टेकडीवरील संरक्षक भिंत आज पहाटे (सोमवारी ) ५ वाजता कोसळली. रहदारीच्या मार्गावरच भिंत कोसळल्याने स्थानिकांना जीव मुठीत घेऊन त्यातून वाट काढावी लागत आहे. पहाटेची वेळ असताना घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली […]

Continue Reading 0
drainage HFS

हिरानंदानी शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रवास गटाराच्या पाण्यातून, विद्यार्थ्यांमध्ये वाढले आजारपण

हिरानंदानी येथील ओर्चीड एव्हेन्यू रोडवरील हिरानंदानी स्कूल शेजारील गटाराचे घाण सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने, येथील विद्यार्थ्यांसह पवईकरांना गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. शाळेतील मुले आजारी पडत असल्याबाबत मुलांच्या पालकांकडून तक्रारी सुद्धा केल्या जात आहेत. पाठीमागील वर्षी समस्येचे निवारण करण्याचे सांगणाऱ्या हिरानंदानी प्रशासनाला अजूनही ते शक्य होत नसल्याने अजून किती दिवस या समस्येशी लढायचे […]

Continue Reading 0
crock and fishing

नियम धाब्यावर बसवत पवई तलावात मासेमारी

@सिद्धार्थ शिरसट पवई तलावात मासेमारीस निर्बंध आहेत. तलावातील मगरी बाहेर आल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. जे पाहता तलावात मगरी आहेत, मगरींपासून सावधान, पाण्यात उतरू नका असे फलक पालिका आणि वन विभागातर्फे लावण्यात आलेले आहेत. मात्र, नियम धाब्यावर बसवत पवई तलावात सर्रासपणे मासेमारी केली जाते आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने, येथे जर एखादा अपघात घडला तर […]

Continue Reading 0
kachra youth power

पालिका अधिकाऱ्यांतर्फे पवईच्या कचरा समस्येची पाहणी

पवईच्या कचरा समस्येबरोबरच या भागात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी कचराकुंडीची मागणी पालिकेकडे युथ पॉवरकडून केली होती. ज्यानंतर या समस्येची पाहणी करण्यासाठी पालिका ‘एस’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी पवईतील कचऱ्याची समस्या असणाऱ्या भागांना भेट देवून, लवकरच ठिकठिकाणी कचराकुंड्यांची सोय करणार असल्याचे सांगितले. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सध्या सर्वत्रच कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचे दिसते. यास पवई […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

आयआयटी लेबर कँपमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

आयआयटी कँपस परिसरात असणाऱ्या लेबर कँपमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. शिलादेवी राकेश शर्मा (१९) असे या विवाहितेचे नाव आहे. मात्र, या विवाहितेच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिसांनी अपमृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. आयआयटी येथील हॉस्टेल क्रमांक चौदाच्या पाठीमागील भागात कामगारांना राहण्यासाठी लेबर कँप बनवण्यात आलेले आहेत. याच लेबर […]

Continue Reading 0
peh no drugs

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती

आ यआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये शुक्रवारी निव फौंडेशन आणि पवई इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबई विभागाचे गुप्तचर अधिकारी कुलभूषण सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला निव फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा कमलप्रित कौर, पवई इंग्लिश हायस्कूल माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका […]

Continue Reading 0
kidney racket

पवई किडनी रॅकेट: सातव्या आरोपीला अटक

हिरानंदानी हॉस्पिटलमधून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटमध्ये पोलिसांनी युसुफ बिस्मिल्लाह दिवान (४५) नामक सातव्या आरोपीला गुजरातमधील नदियाद येथून सोमवारी अटक केली आहे. दिवान हा ट्रक चालक असून रुग्णाची पत्नी म्हणून दाखवण्यात आलेल्या शोभा ठाकूरला किडनी देण्यास प्रवृत्त करणे आणि यातील मुख्य आरोपीशी ओळख करून देणे असा त्याचावर आरोप आहे. मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले असता […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!