सेन्ट्रल एजेन्सीच्या माध्यमातून पवई आणि चांदिवली या दोन भागांना जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गाचे काम पूर्ण झाले असून, आजपासून (बुधवार, २५ डिसेंबर) हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, आयआयटी स्टाफ कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक राणे काका आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पावसाळ्यापूर्वी पवईतील अनेक रस्त्यांची […]
Tag Archives | Chandivali
पवईची वाहतूक कोंडीची समस्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून
अरित्रा बॅनर्जी आणि गौरव शर्मा पवईतील वाहतुकीच्या दैनंदिन समस्येमुळे निराश झालेल्या पवईकरांनी गेल्या आठवड्यात फॉरेस्ट क्लब येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमता, भ्रष्टाचार अशी कारणे पुढे करत त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. मात्र मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून ही समस्या एवढी मोठी आहे का? आणि कसे निराकरण करता येईल, त्यांच्यासमोर काय आव्हाने […]
‘दक्षिण आशियाई क्रीडा’ स्पर्धेत पवईच्या जलतरणपटूला ३ सुवर्णपदके; रचला नवीन विक्रम
काठमांडू येथे डिसेंबर २०१९’मध्ये झालेल्या ‘१३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत’ पवईतील १४ वर्षीय नववीत शिकणारी आपेक्षा फर्नांडिस भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात युवा खेळाडूंपैकी एक आहे. तिने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक; २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक आणि ४x२०० मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकली. र रहेजा विहारमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूलची विद्यार्थिनी असणाऱ्या आपेक्षा फर्नांडिसने जलतरण […]
वृद्ध दाम्पत्याला दिलासा; रिक्षात विसरलेल्या ४० तोळय़ांच्या दागिन्यांचा छडा लावत गुन्हे शाखेने परतवले
रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिन्यांची पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने निराश झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेने दिलासा मिळवून दिला आहे. आपले तपास कौशल्य दाखवत रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून त्यांनी दागिने हस्तगत करत वृद्ध दाम्पत्यास परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने त्या दोघांना ताब्यात घेवून, पिशवीतील एका […]
विनायक लोखंडे ठरला ‘नवोदित चांदीवली श्री २०१९’
चांदिवली येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ‘नवोदित चांदिवली श्री २०१९ किताब चेंबूर येथील मसल इंजिनिअर्स व्यायाम शाळेच्या विनायक लोखंडे यांनी आपल्या नावे केला आहे. मुंबईतील विविध भागातून स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. चांदीवली, पवईच्या इतिहासात प्रथमच एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ती म्हणजे ‘नवोदित चांदीवली श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा २०१९. महाराष्ट्र नवनिर्माण […]
भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० […]
डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले
४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]
चांदिवली मर्डर केस: संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या; आरोपी भावाला अटक
चांदिवली संघर्षनगर येथील एका खोलीच्या वादातून आपल्याच मावस भावाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शहा (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. साकीनाका येथील चांदिवली फार्म रोडकडून संघर्षनगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एमसीजीएम पार्क जमीन भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडल्याचा […]
एस एम शेट्टी रोडच्या कामाची सुरुवात, वाहतूक वळवली
शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर बुधवारी, १३ तारखेपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील २० ते २५ दिवस हे काम चालणार असून, या मार्गाने चांदिवलीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आला […]
मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?
पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]
पवईत भगवा फडकला – चांदिवलीतून दिलीप लांडे तर विक्रोळीतून सुनील राऊत विजयी
महाराष्ट्र राज्य विधानसभा २०१९ निवडणुकीचे निकाल गुरुवारी २४ ऑक्टोबरला घोषित करण्यात आले असून, पवईत शिवसेनेच्या उमेदवारांना पवईकरांनी पसंती दर्शवली आहे. चांदिवली मतदार संघातून दिलीप भाऊसाहेब लांडे तर विक्रोळी मतदार संघातून सुनील राऊत याना पवईकरांनी पसंती दर्शवत निवडून दिले आहे. विक्रोळी विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाल्याप्रमाणे राऊत यांच्या झोळीत आली. मात्र चांदिवली विधानसभेत गेल्या २ दशकापासून आमदार […]
लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी
चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल
पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]
वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]
सात दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
माझा बाप्पा भाग ५
माझा बाप्पा भाग ४
युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम
गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]
माझा बाप्पा भाग २
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]