Tag Archives | Powai

burning car on JVLR

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर बर्निग कार

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर टागोरनगर सिग्नलजवळ एका धावत्या कारला आग लागल्याची घटना मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी घडली. सुदैवाने गाडी चालक या घटनेत बचावला असून, गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. पवईकडे जाणाऱ्या मार्गावर ही गाडी जळत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने पवईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. एमएच […]

Continue Reading 0
sm shetty road

एस एम शेट्टी रोडच्या कामाची सुरुवात, वाहतूक वळवली

शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर बुधवारी, १३ तारखेपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील २० ते २५ दिवस हे काम चालणार असून, या मार्गाने चांदिवलीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आला […]

Continue Reading 0
IMG_0821

पवई इंग्लिश हायस्कुल ४०व्या वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाची ‘झलक’

पवईतील सर्वात जुनी इंग्रजी माध्यमातील शाळा पवई इंग्लिश हायस्कूलने यावर्षी आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या आनंदाचा भाग म्हणून शुक्रवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात त्यांचा ४०वा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव “झलक” मोठ्या उत्साहात पार पडला. दोन भागात झालेल्या या शालेय उत्सवात यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध […]

Continue Reading 0
phishing

सिमकार्ड पडले ‘लाख’ रुपयाचे

नवीन सिमकार्डसाठी ऑनलाइन बुकिंग करणे एका पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. सिमकार्डसाठी पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगून सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. रामबाग पवई येथे राहणारे सौरभ घोष (४७) यांनी नवीन मोबाईल फोन खरेदी केला […]

Continue Reading 0
vruksh tod

मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?

पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]

Continue Reading 0
phishing

२.५ दशलक्ष पौंडचे आमिष दाखवून पवईत महिलेची ४५.६९ लाखाची ऑनलाईन फसवणूक

पवईतील ३१ वर्षीय महिला व्यावसायिकेला २.५ दशलक्ष पौंड देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने ४५.६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोराने इमेल द्वारे आपण यूकेचा नागरिक असल्याची बतावणी करून, तिला भारतात २.५ दशलक्ष पौंड देणगी द्यावयाची आहे, जेणेकरुन ती भारतात चॅरिटीचे काम करू शकेल असे सांगत तिची फसवणूक केली […]

Continue Reading 0
phishing

आयआयटीच्या विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे पडले महागात, सायबर चोरांचा २७ हजाराचा चुना

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. खराब डिलीव्हर झालेल्या पिझ्झाच्या भरपाई रकमेला मिळवण्याच्या नादात सायबर चोरांच्या जाळ्यात अडकून तिला आपल्याच खात्यातील २७ हजार रुपये गमवावे लागले आहेत. पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या सीचा वाजपेयी हिने ऑनलाईन फूड […]

Continue Reading 0
phishing

ओएलएक्सवर सामान विक्रीसाठी ठेवलेल्या दोन पवईकरांना सायबर चोरांचा ८५ हजाराचा गंडा

ओएलएक्सवर आपल्या घरातील जुने फर्निचर आणि गादी विक्रीसाठी जाहिरात करणाऱ्या दोन पवईकरांना बनावट ग्राहक बनून सायबर चोरांनी ८५ हजाराला गंडवल्याचा प्रकार आज (शनिवारी) पवईत उघडकीस आला आहे. पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. आयआयटी मुंबई येथे कार्यरत असणारे सनी सदाना (३५) हे आपल्या परिवारासह पवईतील विजय विहार येथे राहतात. […]

Continue Reading 0
house breaking

नेपाळी सुरक्षारक्षकांच्या टोळीची पवईत ५६ लाखाची चोरी

इमारतीच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या नेपाळी सुरक्षारक्षकांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून फ्लॅटमध्ये घुसून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत ५६ लाखाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी पवई परिसरात घडला आहे. घरातील मंडळी सुट्टीसाठी परदेशी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी आपला डाव साधला आहे. याप्रकरणात पवई पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करून सुरक्षारक्षकांचा शोध सुरु केला आहे. कुर्ला […]

Continue Reading 0
powai lake cleanup

आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांची पालिकेसोबत पवई तलाव स्वच्छता मोहीम

मुंबईतील पवई तलावाची पाण्याची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे ऱ्हास झाली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक, सांडपाणी पावसाच्या तलावामध्ये सोडले जाते. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभुदय – आयआयटी पवई आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव […]

Continue Reading 0
phishing

कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून दोन बहिणींना सव्वालाखाचा गंडा

कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करत एका ठगाने पवईतील दोन बहिणींच्या खात्यातील सव्वा लाखावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. पवईतील आयआयटी परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाने १८ ऑक्टोबरला माथेरानला फिरायला जाण्यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. भाड्याचे पेमेंट करण्यासाठी […]

Continue Reading 0
sakinaka acp office suicide

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग कार्यालयात एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. सुधीर गुरव (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते पवई पोलीस ठाण्याशी संलग्न होते. त्यांच्या आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नसून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याशी […]

Continue Reading 0
hatya

पालिकेच्या सुरक्षा रक्षकावर गर्दुल्यांचा प्राणघातक हल्ला

पवईतील निटी भागात पाईपलाईनला लागून भांडूपकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाण्यास रोखले म्हणून ३ तरुणांनी येथील पालिकेच्या सुरक्षारक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या संदर्भात पवई पोलीस भादंवि कलम ३५३, ३३४ सह गुन्हा नोंद करून अधिक तपास करीत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मुंबईच्या अनेक भागातून जात आहेत. पवईतील […]

Continue Reading 0
lande thakrey

पवईत भगवा फडकला – चांदिवलीतून दिलीप लांडे तर विक्रोळीतून सुनील राऊत विजयी

महाराष्ट्र राज्य विधानसभा २०१९ निवडणुकीचे निकाल गुरुवारी २४ ऑक्टोबरला घोषित करण्यात आले असून, पवईत शिवसेनेच्या उमेदवारांना पवईकरांनी पसंती दर्शवली आहे. चांदिवली मतदार संघातून दिलीप भाऊसाहेब लांडे तर विक्रोळी मतदार संघातून सुनील राऊत याना पवईकरांनी पसंती दर्शवत निवडून दिले आहे. विक्रोळी विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाल्याप्रमाणे राऊत यांच्या झोळीत आली. मात्र चांदिवली विधानसभेत गेल्या २ दशकापासून आमदार […]

Continue Reading 0
hatya

पवईत सुरक्षा रक्षकाची गळा चिरून हत्या

पवईतील तुंगागाव येथील एका रहिवाशी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल पवईत समोर आला आहे. इमारतीच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना मिळून आला होता. या संदर्भात पवई पोलिसांनी भादंवि कलाम ३०२नुसार गुन्हा नोंद केला असून, इमारतीच्या लिफ्ट ऑपरेटरने हा खून केला असल्याची माहिती मिळत असून, पवई पोलीस पाहिजे आरोपीचा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!