जेव्हीएलआरवर अपघात सत्र सुरूच; अपघात, वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी संतप्त आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर उड्डाणपुलावर सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत क्लिनर […]
Tag Archives | Powai
विहार तलाव होणार सुरक्षित
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाला सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला असून, बंधाऱ्याची दुरुस्ती, संरक्षक भिंत, लोकांना तलाव भागात प्रवेश रोखण्यासाठी उपाययोजना, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी छोटे बगीचे आणि कठडे अशी सुरक्षा आता विहार तलावाला मिळणार आहे. यामुळे तलावात होणाऱ्या दुर्घटना, उपद्रव रोखण्यात यश मिळणार आहे. सोबतच तलावाचे सौन्दर्यकरण सुद्धा होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्तोत्रांपैकी […]
खड्यात ट्रेलर फसल्याने ९ तास जेव्हीएलआर ठप्प, चाकरमान्यांचे हाल
@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगरजवळ बुधवारी एक भलामोठा ट्रेलर खड्यात चिखलात अडकल्याने तब्बल ९ तास जेव्हीएलआरवरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी सकाळी ६ वाजता मेट्रोच्या कामासाठी लागणारे टीबीएम मशिन घेवून एक ट्रेलर सिप्झच्या दिशेला जात होता. पाठीमागील काही दिवसात सतत पावसाची […]
लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी
चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” २० ऑक्टोबर २०१९
महिला डॉक्टरशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला अटक
पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयातील २६ वर्षीय महिला डॉक्टरशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका ४३ वर्षीय इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयात आरोपी इसम संजय गांधी याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या आईला कॅन्सर उपचारासाठी दाखल केले होते. तो […]
मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवून देण्याचा बहाणा करून वैद्यकीय कर्मचाऱ्याची १६ लाखाची फसवणूक
पवईत मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घर मिळवून देतो असा बहाणा करून सायन रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची १६ लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचे या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते, मात्र प्रत्येकाचे हे […]
पवईत शाळेतील छताचा भाग कोसळल्याने विद्यार्थी जखमी
पवईतील आयआयटी भागात असणाऱ्या ज्ञान विद्यामंदिर शाळेच्या छताचा काही भाग कोसळून शाळेत असणारे ४ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी पवईत घडली. शाळेने त्वरित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे पालकांच्यात नाराजी असून, वेळच्या वेळी विद्यार्थ्यांकडून फी उकळणारे शाळा प्रशासन इमारतीच्या डागडुजीत कानाडोळा करत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. या […]
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात दोन वेळा लागू झाला जमावबंदीचा आदेश
आरेमधील मेट्रो कारशेड उभे करण्यासाठी सुरु असणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी आणि […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” १३ ऑक्टोबर २०१९
मॅरेथॉन पडली महागात, चोरट्यांनी गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू लांबवल्या
पवई आयआयटीमध्ये रविवारी पहाटे मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्या चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास ५ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. चोरट्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यानंतर महागडे मोबाईल, पाकीट तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड लंपास केले आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांना माहिती देण्यात आली असून, ते अधिक […]
ऑनलाईन साडी खरेदी करायला गेली आणि ५० हजार घालवून बसली
सध्या उत्सवाचे दिवस असून, ऑनलाईनवर खरेदीला उधान आले आहे. मात्र अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी केलेल्या ७९९ रुपयांच्या साडीसाठी रहेजाविहार येथे राहणाऱ्या एका गृहिणीला चक्क ५० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पवई पोलिस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणारी गृहिणी […]
जेव्हीएलआरवर अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
गुरुवारी (१० ऑक्टोबर) जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर पंचकुटीर येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना पवई परिसरात घडली. सदाशिव येरम (२३) आणि शैलेश मिडबावकर (२३) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांचा अजून एक मित्र अनिकेत महेश जांभळे (२१) हा गंभीर जखमी झाला असून, […]
जनावरांची दूधक्षमता वाढविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’ औषधाचा मोठा साठा पवईत पकडला
दूध देणाऱ्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’ नामक औषधाचा मोठा साठा मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पवई येथे पकडला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ‘ऑक्सिटोसीन’च्या दीड हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. या औषधाचा मुंबईतील विविध तबेल्यांमध्ये पुरवठा करण्यात येणार होता. नजीब खोटाल, अनिस खांदे आणि मासी सादिक खोत अशी […]
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत साक्षी गुप्ताला सुवर्ण पदक
मुंबईतील, कांदिवलीतील प्रकाश कॉलेज येथे आयोजित मुंबई जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत पवईकर साक्षी गुप्ताने सुवर्णपदक मिळवत पवईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. साक्षी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. ४ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यापूर्वीही ती जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण तर राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे.
हिरानंदानी फाऊडेशन शाळेने कोरले ‘फ्रँक अँथनी इंटरस्कूल डिबेट’ ट्रॉफीवर आपले नाव
हिरानंदानी फाऊडेशन शाळेच्या (एचएफएस) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामुळे येथील विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र गेली कित्येक वर्षे हुलकावणी देत असणाऱ्या ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धे’च्या ट्राफिवर आपले नाव कोरत अजून एक मानाचा तुरा शाळेच्या शिरपेचात खोवला आहे. कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धा […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” ०६ ऑक्टोबर २०१९
फार्मा कंपनीला सायबर फ्रॉडद्वारे ४५ लाखाला गंडवले
ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन घोटाळेबाजांनी पवई पोलिसांच्या अखत्यारीतील एका फार्मासिटिकल कंपनीला ४५ लाखाला गंडवले आहे. थेट दुसर्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून, कंपनीचे मेल खाते हॅक करून त्यातील सगळे पुराव्यांचे मेल डिलीट करून कोणताही मागमूस न ठेवता मोठ्या सफाईने हे काम करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ संचालकानी यासंदर्भात अज्ञात आरोपींविरोधात ६३.४३५ डॉलर्सच्या (जवळपास ४५ लाख रुपये) […]
नाट्य स्पर्धेत पवई इंग्लिश हायस्कूलला द्वितीय पुरस्कार
पवई इंग्लिश हायस्कूलच्या (पीईएचएस) विद्यार्थ्यांनी शिक्षणासह नाटक आणि परफॉर्मिंग आर्टचे महत्त्व कायम ठेवत सलाम बॉम्बे फाउंडेशन कला अकादमी आयोजित आंतरशालेय कला महोत्सव २०१९ स्पर्धेत नाट्य विभागात दुसरे स्थान मिळवले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना थिएटर प्रॉडक्शनमध्ये काम करण्याची किंवा पडद्यामागे मदत करण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य दाखविता यावे या उद्देशाने “सलाम बॉम्बे फाउंडेशन” क्रीडा, नाटक, […]