संघर्षनगर इमारत क्रमांक १० जवळ काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडला. नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.सुदैवाने जिवित हानी टळली आहे. अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ बंद करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या […]
Tag Archives | Powai
बिल्डर आणि खाजगी ट्रस्टच्या मालकी वादात बळी पडलेल्या रहेजा विहारकरांचे अधिकारासाठी रविवारी निषेध आंदोलन
बिल्डर आणि एका खाजगी ट्रस्टच्या मालकी हक्काच्या वादात रहेजा विहारमधील घर मालकांना आपल्या घराचे कोणतेही कायदेशीर व्यवहार करण्यास आलेल्या बंदीच्या नोटीसी विरोधात रविवार, ३० जूनला येथील स्थानिकांकडून निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रहेजा विहार येथील पालिका इन्स्टिट्यूटच्या जवळ बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या मोकळ्या जागेत सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. पवई, चांदिवलीच्या […]
पवई, जेव्हीएलआरवरील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था; नागरिकांची प्रचंड गैरसोय
@प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे आंदोलने, पोलीस कोठडी आणि सततच्या पवईकरांच्या पाठपुराव्याच्या खटाटोपीनंतर अखेर जुलै २०१५ मध्ये मंजुरी मिळून जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील मुख्य गणेश विसर्जन घाट, आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथे महानगर पालिकेकडून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली. मात्र काही दिवसातच पालिकेच्या देखरेखेखाली असणाऱ्या आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथील शौचालयांची दुरावस्था झाली असून, पाठीमागील दोन […]
बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम
एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]
युवतीला पाहून हिरानंदानीत रिक्षा चालकाचे अश्लील वर्तन
हिरानंदानी परिसरात जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या १९ वर्षीय युवतीसमोर एका ऑटोरिक्षा चालकाने अश्लील वर्तन केल्याची तक्रार युवतीने केली आहे. घटनेची या युवतीने ट्विटद्वारे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पवईतील हिरानंदानी भागात जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या १९ वर्षीय युवतीसमोर एका ऑटोरिक्षा चालकाने तिला पाहत अश्लील वर्तन केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. युवती मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी […]
मेट्रो – ६ प्रकल्पाला सामाजिक कार्यकर्त्यांनी सुचवला पर्यायी मार्ग
मुंबई मेट्रो – ६ प्रकल्प (स्वामी समर्थनगर-लोखंडवाला कॉम्प्लेक्स-विक्रोळी) नियोजनच मुळात चुकीचे आहे. स्टेशनची जागा, पर्यावरण रक्षणासाठी उपाय-योजना, जेव्हीएलआरवरील वाहतूक कोंडी अशा अनेक समस्या उद्भवणार असल्याने नागरिकांनी याला विरोध करत भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या मागणी अंतर्गत पर्यायी मार्ग सुचवला आहे. आता कार्यान्वित असणारा प्रकल्प हा वाहतूक कोंडी, निसर्गाचे नुकसान करणारा असून याला पवईकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध […]
विद्यार्थीनीला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या प्रोफेसरला अटक
मुंबईतील एका नामांकित अभियांत्रिकी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडिया आणि इमेलच्या माध्यमातून मानसिक त्रास देणाऱ्या माजी प्रोफेसरला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने या पीडितेसह अन्य मुलींनादेखील असेच छळले असल्याचे समोर आले आहे. पवईतील एका नामांकित विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडणाऱ्या, तिला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्या विश्वविद्यालयाच्या माजी प्रोफेसरला पवई […]
हिरानंदानीत हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग
हिरानंदानी येथील एव्हीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर लागलेल्या आगीला आठवडा उलटला नसेल की, येथील हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर डक्टजवळ, कॅफेच्या भागाला आग लागल्याची घटना आज सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दल आणि हिरानंदानी एसटीएफ यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, येथील बोट कॅफेच्या एसीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे अग्निशमन दलाकडून […]
पवई तलाव भागात तरुणावर प्राणघातक हल्ला; एकाला अटक, दोघांचा शोध सुरु
पवई तलाव भागात तरुणीला छेडछाड करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री ७.३० वाजता पवई परिसरात घडली आहे. रोहित बावधाने असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम ३२६ नुसार गुन्हा नोंद करून, हल्ला करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात […]
विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद
पवईतील विजय विहार रोडवर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून, हा रस्ता आम्हीच दुरुस्त केला असल्याचा श्रेयवाद सध्या स्थानिक आमदार आरिफ नसीम खान आणि स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्यात रंगला आहे. दोघांनीही हे काम आमच्याच प्रयत्नातून आणि फंडातून केला जात असल्याचा दावा केला आहे. श्रेयवादात यांचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून, सोशल […]
हिरानंदानी, इवीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग, बेडरूम जळून खाक
पवई हिरानंदानी गार्डन परिसरातील इविटा इमारतीच्या १५व्या मजल्यावरील १५०२ या फ्लॅटमध्ये सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज घडली. घरमालक शेनॉय यांचा परिवार यावेळी घरातच होता, आगीची माहिती मिळताच त्यांनी घराबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यासंदर्भात […]
पालिका उद्यान विभागाच्या मदतीने पवईत वडाच्या झाडाला जीवदान
देशभर जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असतानाच पवईतील फुटपाथवरील एका बेवारस वडाच्या झाडाला महानगरपालिका ‘एस’ वॉर्ड उद्यान विभागातील उद्यान विद्या सहाय्यक अधिकारी अक्षया म्हात्रे आणि पवईतील नागरीकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या वाचवलेल्या वडाच्या झाडाला आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात पुनर्रोपण करण्यात आले आहे. ‘पवई, आयआयटी येथील हरेकृष्ण रोडवर फुटपाथवर एक वडाचे झाड असून, […]
पार्कसाईट येथे भरधाव टँकरने ६ लोकांना उडवले; तिघांचा मृत्यू
पार्कसाईट, विक्रोळी येथील कैलाश कॉम्पलेक्स भागातील उतारावर एका भरधाव टँकरने ६ जणांना उडवल्याची घटना (आज) शनिवारी रात्री उशिरा १०.१० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेतील जखमींना त्वरित घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, यातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष दर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानीकडून विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरच्या चालकाचा पार्कसाईट येथील […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागातील डेब्रिज उचलली
आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील […]
अतिउत्साही नागरिकांनी वाहतुकीसाठी खुला केला एसएमशेट्टी रोड
सेन्ट्रल एजेन्सीच्या माध्यमातून पवई आणि चांदिवली या दोन भागांना जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर रोड निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम मार्गावर असतानाच काही अतिउत्साही नागरिकांनी यासाठी लावलेले बॅरिकेड हटवत वाहतूक सुरु केली आहे. मात्र रस्ता पूर्ण तयार नसून, यामुळे रस्ता खराब होण्याची शक्यता पालिका रोड विभागाकडून व्यक्त होत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने सेन्ट्रल एजन्सीच्या माध्यमातून […]
जागतिक पर्यावरण दिनी पवई तलाव वाचवण्यासाठी मुंबईकर एकवटले
आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक मानाचे स्थान मिळवलेल्या पवई तलाव भागाचा पाठीमागील काही वर्षात उकिरडा आणि नाला झाला आहे. पवई परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी पवई तलावात सोडले जात असल्यामुळे त्याचा श्वास गुदमरून तो नष्ट होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. त्यात भर म्हणूनच की काय आता या भागात खोदकाम आणि बांधकामानंतर निघणारा मलबा आणून […]
तापमान कमाल, बच्चेकंपनीची धमाल ..!
मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून, मुंबईकर आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळत आहेत. जावेच लागले तर पुरेशी काळजी घेताना दिसतात. उन्हाच्या कडाक्यात स्वतःला वाचवण्यासाठी जिकडे तरुण मंडळी विविध कॉस्मेटीक प्रोडक्ट्सचा वापर करताना आढळून येत असतानाच, पवईतील बच्चेकंपनीने मात्र या उन्हाच्या तडाख्याला न-जुमानता धमाल-मस्ती करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे. पवई, हिरानंदानी येथील चंद्रभान शर्मा चौकात […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागात डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात पालिका दाखल करणार फौजदारी गुन्हा
पाठीमागील काही दिवसांपासून पवई तलाव भागात अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) टाकला जात असून, यामुळे पवई तलावाचे भवितव्य धोक्यात येत आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने […]
पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा
ग्रामीण भागात घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैल–मुत्र टाकण्यासाठी परिसरात मोकळ्या जागेत भलामोठ्या रुंदीचा खड्डा मारून त्यात ते टाकले जाते. ज्यास ग्रामीण भाषेत “उकीरंडा” असा शब्द वापरला जातो. पवईतील पवई तलाव भागाची सुद्धा पाठीमागील काही वर्षात अशीच अवस्था झाली आहे. परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी सध्या तलावात सोडले जात असून, त्याचा श्वास गुदमरू लागला […]
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना
आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]