अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्याची बतावणी करून जनरल स्टोअर मालकाची फसवणूक करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीला शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कांदिवली पूर्वेकडील रहिवासी असून, ड्रायव्हर म्हणून काम करतो. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम २०४ (सार्वजनिक सेवक असल्याचे […]
