आवर्तन पवई बद्दल (about)

आवर्तन पवई (Avartan Powai)मला इंग्रजी उत्तम येते परंतू मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतू मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणार माध्यमच नाहीये. अश्या सर्वांसाठी त्यांचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘आवर्तन पवई (Avartan Powai)’. तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच आवर्तन पवई.

 

६. ७५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या पवईत ६०% पेक्षा जास्त जनसंख्या मराठी बोलणारी, समजणारी आणि विचार करणारी आहे. मात्र ह्या जनतेला आपल्या भाषेत आपले विचार मांडायला देणारे व्यासपीठ मिळात नसल्याने या लोकांची मते, विचार आणि समस्या व्यक्त झालेल्या नाहीयेत याची खंत नेहमीच या पवईकरांना राहीलेली आहे. या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याबरोबरच त्यांचे विचार, त्यांची मते आणि परिसरातील समस्या यांना एक स्वर देण्याचे काम ‘आवर्तन पवई’ (Avartan Powai) करणार आहे.


मग आता वाट कशाची पाहताय? चला उठा आणि आपली मते, आपले विचार आणि परिसरातील समस्या इथे किंवा [email protected] वर पाठवा योग्य विचाराना, समस्यांना ‘आवर्तन पवई’ प्रसिद्धी देईल आणि आपल्या लढाईत आपला सहकारी बनेल.

जाहिरातीसाठी संपर्क: ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!