पवई तलावावरील प्रेमी युगलांच्या अश्लील चित्रफीती व्हायरल, गुन्हेगारांना अटक करण्याची युथ पॉवरची मागणी

युथ पॉवर संघटनेचे मुंबई अध्यक्ष वीरेंद्र धिवार वपोनि पवई पोलीस ठाणे अनिल फोपळे यांना कारवाईचे पत्र देताना.

@रविराज शिंदे

पवई तलाव भागात प्रेमरसात मग्न असणाऱ्या प्रेमी युगलांचे फोटो आणि चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळीच या भागात सक्रीय झाली आहे. मुंबईतील युथ पॉवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हातात या चित्रफिती पडताच, त्यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल फोपळे यांची भेट घेवून याबाबत लेखी निवेदन देत चित्रफिती व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

पवईतील पवई तलाव पर्यटकांसोबतच प्रेमीयुगुलांचा सुद्धा हक्काचा अड्डा बनला आहे. मात्र प्रेमी युगलांचे उघड्यावर चालणाऱ्या अश्लील वर्तनांमुळे निसर्गसंपन्न पवई तलावाची खरी ओळख मिटली जाण्याची चिंता पवईकरांना सतावत आहे. जेष्ठ नागरिक आणि मुलांना फिरायला घेवून येणाऱ्या मुंबईकरांनी इकडे येणेच टाळणे पसंत केले आहे. एवढे सगळे घडत असतानाच प्रेमीयुगलांच्या अश्लील वर्तनाच्या चित्रफिती आणि फोटो काढून सोशल मिडीयावर टाकणारी टोळीच चक्क सध्या पवई तलाव परिसरात सक्रिय झाली असल्याचे समोर आले आहे.

विविध सोशल माध्यमांवर पवई तलाव भागातील प्रेमीयुगलांची अश्लील वर्तनाचे व्हिडिओ वायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पवई तलाव परिसरात येणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या भविष्यासह कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

पवई तलाव सौंदर्यकरण प्रकल्पानंतर पवई तलावाला एक नवी झळाळी मिळाली आहे. तलावाच्या सुरक्षा कठड्यांवर तरुणाई प्रेमरंगात बुडालेली आढळून येते. यातच काही जोडपी राजरोसपणे अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी पोलीस आणि पालिका प्रशासनाला वारंवार केल्या जात आहेत. मात्र पोलीस आणि महानगरपालिका याकडे डोळेझाक करत असल्यामुळे दिवसेंदिवस ते वाढत जात आहे.

‘पालिकेने येथील रुपडे पालटताना जनतेसाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले-स्टेशन्स, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टे आणि बेंचेसची सोय केली आहे. मात्र तरुण-तरुणी तेथे बसून गैरप्रकार करताना आढळून येत असल्याने आम्ही येथे येणेच टाळतो’ असे याबाबत बोलताना काही मोर्निंग वॉकर्सनी सांगितले.

‘तलाव परिसरात बसणाऱ्या या तरुणाईची अश्लील वर्तनाची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचे आम्हाला आढळून आल्यानंतर आम्ही पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेवून त्यांना पत्र देत सोशल मिडीयावर अशा चित्रफिती व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे’ असे याबाबत बोलताना संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले.

व्हायरल होणाऱ्या चित्रफितींचा फायदा घेवून, कोणतेही गैरकृत्य घडू शकण्याची शक्यता नाकरता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर व्हायरल करणाऱ्या लोकांचा शोध घेवून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी संस्थेचे मुक्ताराम कांबळे यांनी यावेळी केली.

तरुणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेतर्फे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत. तसेच येथे गस्त घालणाऱ्या पूर्णवेळ सिक्युरिटी गार्डसच्या नियुक्ती कराव्यात अशा प्रकारच्या मागण्यासुद्धा नागरिकांकडून होत आहेत.

, , , , , , , , , , , , ,

7 Responses to पवई तलावावरील प्रेमी युगलांच्या अश्लील चित्रफीती व्हायरल, गुन्हेगारांना अटक करण्याची युथ पॉवरची मागणी

 1. राम यमगर July 5, 2019 at 8:31 am #

  सर उल्हासनगर मध्ये चोपडा कोर्ट २ वर्ग केस नंबर R.c.c.1000477(४७७) पोलीस रिपोर्ट जावक नंबर ४७१ व ४९८ मधील फरार आरोपी हे अटक आरोपींना माहिती असुन ६ वर्षा पासून कोर्टात आजतागायत हजर करण्यात आले नाही तसे मी शासन मान्य आपले सरकार पोर्टल मध्ये उल्हासनगर ३ चोपडा कोर्ट केस नंबर ४७७ मधील पोलीस रिपोर्ट जावक नंबर ४७१ व ४९८ मधील फरार आरोपी मिळत नाही का असे तक्रार दाखल केली मला सुचना दिली की तुमची कोर्ट केस नंबर ४४७ च्या अनुषंगाने तपास करून फरार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देण्यात आले आहेत सर मात्र फरार आरोपी कोर्टात आजतागायत हजर करण्यात आले नाही सर आपले मदत हवी

 2. Rakesh Mohite March 12, 2018 at 6:14 pm #

  Good work Viru…. ?????

 3. Sarguru Imran March 12, 2018 at 6:13 pm #

  Very correct

 4. Santosh Bansode March 12, 2018 at 6:12 pm #

  म्हणजे आपन सर्व समर्थन करता जे पवई येथे नवतरूणाची अश्लीलतेचा हो ना म्हणजे या ठीकाणी सजग नागरिक परिवार याना एकप्रकारे येण्यास बंदीच घालता आणि पवई येथे ही सैराटची पुनरावृत्ती करता आणि समर्थनसुद्धा करता…
  मला नाही पटत ….
  हो जर हे तरूण सार्वजनिक ठीकानी असे प्रकार करतात तर गुन्हा का ….
  हो तेच जर एकांतात म्हणजे वैयक्तिक ठीकाणी केल असेल तर तो गुन्हा असु शकतो असे मला वाटते…
  आपणास आत्मचितनाची गरज आहे….
  काही भावना दुखावल्यास दिलगीर व्यक्त करतो…

 5. Vidyanand Kakade March 12, 2018 at 6:11 pm #

  योग्य मागणी आणि कडक शिक्षा झालीच पाहिजे…

 6. Samir Choudhary March 12, 2018 at 6:10 pm #

  Good initiative

 7. Vinod Rathod March 12, 2018 at 6:10 pm #

  Take a legal action and stop all those nonsense thing which is happing in our locality….

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!