Author Archive | आवर्तन पवई

suicide death

पवईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

पवईत पीजीमध्ये राहणारा एक २२ वर्षीय तरुण राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्युची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे. अहमदनगर येथील असणारा श्रेयस कलापुरे हा पाठीमागील काही वर्षापासून, पवई येथील चैतन्यनगर भागात असणाऱ्या सुजा निकेतन इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून […]

Continue Reading 0
United for a Cause - A New Chapter in Service with Helping Hands for Humanity and Indian Minorities Foundation

United for a Cause: A New Chapter in Service with Helping Hands for Humanity and Indian Minorities Foundation

In a vibrant display of unity and commitment to service, Powai based NGO Helping Hands for Humanity has joined forces with the Indian Minorities Foundation for the transformative Sewa Pakhwada initiative, inspired by Honourable Prime Minister Narendra Modi’s vision for a more robust and united nation. Under the distinguished leadership of Satnam Singh Sandhu, a […]

Continue Reading 0
Powai Vivek Govilkar's book 'Gandhi and His Critics' launched by Sharad Pawar

गोविलकर यांच्या ‘गांधी अँड हिज क्रिटीक्स’ पुस्तकाचे शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन

पवईकर, लेखक, स्तंभ लेखक विवेक गोविलकर यांच्या ‘गांधी अँड हिज क्रिटीक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. हे पुस्तक सुरेश द्वादशीवार यांचे पुरस्कार विजेते मराठी पुस्तक ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती […]

Continue Reading 0
The high-level inquiry report submitted to the BMC commissioner regarding the death of a woman after falling into a storm water drain

पवईतील महिलेचा पर्जन्य वाहिनीत पडून मृत्यू झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांना सादर

दुर्घटनेच्या ठिकाणी त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी आणि एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष पाठीमागील आठवड्यात मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावेळी अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत पडून पवईतील रहिवाशी विमल अपाशा गायकवाड (४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भात मृत महिलेच्या नातेवाईकांनी याची उच्चस्तरीय चौकशी […]

Continue Reading 0
shivsena ubt protest badlapur rape case

पवईत बदलापूर घटनेचे पडसाद; तोंडावर काळ्या पट्ट्या लावून शिवसैनिक रस्त्यावर

@रविराज शिंदे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शालेय कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रभर उमटत असून, संतापाची लाट सर्वत्र पसरली आहे. पवईत देखील महिलांमध्ये याचा आक्रोश पहायला मिळत आहे. आज, बुधवार २१ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पवईतील प्रभाग क्र. १२२च्या समस्त महिला आघाडीसह […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

म्हाडाची स्वस्त सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ३० लाखांची फसवणूक

एका खासगी बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्याच एका मित्राने ३० लाखांला गंडा घातला आहे. पवई येथे बाजारभावापेक्षा कमी दरात म्हणजेच ८५ लाख रुपयांमध्ये ९७० चौरस फूट फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी मित्राला ३७ लाख रुपये दिले असून, उर्वरित रक्कमेसाठी कर्ज घ्यायचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपले पती […]

Continue Reading 0
Rs 84 lakhs gold coins stolen from a shipping recruitment company in Powai

पवईतील शिपिंग कंपनीतून ८४ लाखाच्या सोन्याच्या नाण्यांची चोरी

पवई येथील शिपिंग रिक्रूटमेंट कंपनीच्या कार्यालयातून ₹८४ लाख किंमतीची सोन्याची नाणी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ९ ऑगस्ट रोजी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तिजोरी तपासली असता लॉकरमधून सोन्याची नाणी गायब असल्याचे आढळून आले. जगभरातील विविध शिपिंग-संबंधित कंपन्यांच्या आवश्यकतांनुसार जहाज क्रूची नियुक्ती आणि व्यवस्थापन करणाऱ्या पवईतील शिपिंग रिक्रुटमेंट कंपनीचे संचालक व महाव्यवस्थापक यांनी याबाबत पवई […]

Continue Reading 0
To Live a luxurious life two minors broke flat in Hiranandani, Powai

आलिशान जीवन जगण्यासाठी अल्पवयीन मुलांची पवईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी

आपल्या मित्रांना पाहून अलिशान जीवन जगण्यासोबतच सुखवस्तू मिळवण्यासाठी २ अल्पवयीन मुलांनी पवई, हिरानंदानी येथील एका उच्चभ्रू इमारतीत फ्लॅट फोडून ३.४५ लाखाचे सोन्या हिऱ्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यातील एक नीट परीक्षेची (NEET) तयारी करत आहे तर दुसरा इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. दोघेही सधन कुटुंबातील असून, चांदिवली आणि हिरानंदानी येथील […]

Continue Reading 0
No asphalt - no concrete – BMC S ward filled potholes with waste materials1

पालिकेचा अजब कारभार; नो डांबर.. नो काँक्रिट.. वेस्ट मटेरियल टाकून भरले खड्डे

पावसाच्या हजेरीत मुंबईत पडलेल्या खड्डयांमुळे एकंदरीत पालिका कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ऍक्शन मोडवर असलेल्या पालिका आयुक्तांच्या निर्देशाला सहाय्यक अभियंत्यांनीच उघड्यावर सोडल्याचे चित्र समोर आले आहे. पवईतील आयआयटी भागात पडलेल्या खड्यांवर पालिकेने वेस्ट मटेरियल टाकून खड्डे भरण्याची अजब युक्ती लढवत लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. मुंबईत पाठीमागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी […]

Continue Reading 0
mumbai police return stolen gold property

Housemaid Betrays Trust, Steals Over Rs 5.8 Lakh in Jewellery and Cash from Powai Residence

In a shocking turn of events, a seemingly trustworthy housemaid has left a Powai family reeling after stealing jewellery worth Rs 5.89 lakh. The incident, which unfolded in the upscale Raheja Vihar area, has led to the arrest of the accused under Section 306 of the Bhartiy Nyay Sanhita. Sultana Lalu Shaikh, a resident of […]

Continue Reading 0
raj grandeur

Daring Daylight Burglary: Masked Thieves Strike Powai’s High-rise Building, Escape with Lakhs in Gold and Cash

In a bold daylight theft, masked burglars break into an upscale residential complex in Powai on Monday, making off with gold ornaments and cash worth ₹3 lakh. The dramatic theft has left the local public on edge as theft incidents increased in the area. The audacious burglary occurred at the Raj Grandeur building, where two […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

पवई म्हाडा इमारतीत चोरट्यांनी २ घरे फोडली

मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आहे. पवई परिसरात देखील अशा काही घटना समोर आल्या असून, पवईतील म्हाडा इमारतीत चोरट्यांनी विविध दोन माळ्यांवरील घरे फोडून १.८९ लाखाच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर हात साफ केला आहे. पवईतील विविध व्हाट्स ऍप गृप्समधून पवई […]

Continue Reading 0
mumbai police return stolen gold property

घरकाम करणाऱ्या महिलेचा ५.८ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

घरकामासाठी असणाऱ्या महिलेवर विश्वास ठेवून तिच्या ताब्यात घर सोपवणे पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. घरकाम करण्याच्या बहाण्याने या महिलेने घरातील अंदाजे ५.८९ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पवईतील रहेजा विहारमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करत महिलेला अटक केली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेजा […]

Continue Reading 0
raj grandeur

मास्क घालून चोरट्यांची पवईत उच्चभ्रू इमारतीत चोरी

पवईतील एका उच्चभ्रू इमारतीत घुसत चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावत इमारतीत प्रवेश करून फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. पाठीमागील काही दिवसांपासून पवईतील विविध भागात चोरीच्या काही घटना वाढलेल्या असून, अशीच एक धक्कादायक घटना पाठीमागील सोमवारी पवई परिसरात उघडकीस आली […]

Continue Reading 0
tree uprooted jaibheem nagar powai1

पवईत बेघर झालेल्यांवर अस्मानी संकट; जयभीम नगरमध्ये मोठं झाड कोसळलं

फूटपाथवर झोपलेल्या दोन लहान मुलांना वाचविण्यात यश – रविराज शिंदे पवईतील जयभीम नगर येथील रहिवाशांचे डोक्यावरचं छत बेकायदेशीर रित्या तोडल्यानंतर रस्त्यावर आलेल्या कसेबसे आपला संसार चालवणाऱ्या जयभीम नगर रहिवाशांची तारेवरची कसरत दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांची आणखीनच परवड होत आहे. त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच पवईतील ते राहत असणार्‍या […]

Continue Reading 0
marwah bridge open for traffic movement

मारवाह रोड वाहतुकीसाठी खुला

पवई आणि मरोळ यांना जोडणारा महत्वाचा दुवा असणारा मारवाह रोड अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ३ वर्षाचा दीर्घ कालावधी आणि ३ अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आणि शिवसैनिकांच्या दणक्यानंतर अखेर बुधवार, १० जुलैपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पवईवरून मरोळ, एमआयडीसीकडे जाण्यासाठी मारवाह पुलामार्गे शोर्टकट आहे. अवघ्या ५ मिनिटात या मार्गाने मरोळ आणि […]

Continue Reading 0
crocodile powai lake

मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या तरुणाला पवईतून अटक

पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. पवई येथील फुलेनगर परिसरात राहणारा हा तरुण मगरीचे पिल्लू विक्रीच्या तयारीत असताना सापळा रचून वन विभागाने त्याला ताब्यात घेतले. एक महिन्याच्या या मगरीच्या पिल्लाची लांबी ३२ सेंटीमीटर एवढी आहे. यश पारगावकर (२१) असे तस्करी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुलूंड परिमंडळाकडून […]

Continue Reading 0
powai lake overflow 2024

पवई तलाव ओसंडून वाहू लागला; पवईत सर्वाधिक ३१४ मिमी पावसाची नोंद

शनिवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, ८ जुलैला पवई तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. तलाव ओसंडून वाहू लागल्याची माहिती समजताच पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी सोमवारी पर्यटकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. धोका पाहता येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात पालिका आणि पोलिसांतर्फे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!