पवई येथे अपघातात एका तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

file photo

पवई येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) आज पहाटे, ०५ सप्टेंबर खड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पाठीमागील महिनाभरात जेविएलआरवर खड्यामुळे जीव गमवावा लागल्याची ही दुसरी घटना आहे.

देवांश पटेल असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही तरुण हे अंधेरी, एमआयडीसी भागातील रहिवासी आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, देवांश आणि स्वप्नील हे दोन मित्र लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेवून आपल्या एक्तीवा गाडीवरून पहाटे जेविएलआरमार्गे घरी परतत होते. पवई येथील भवानी पेट्रोलपंप जवळील भागात ते पोहचले असताना असमांतर रस्ता आणि खड्डे यामुळे मोटारसायकलवरील नियंत्रण गेल्याने पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसखाली आले.

“माहिती मिळताच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तपासून डॉक्टरांनी देवांश पटेल याचा दाखलपूर्व मृत्यू झाला असल्याचे घोषित केले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “स्वप्नील विश्वकर्मा हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.”

या मार्गावर असलेल्या खड्यांमुळे पाठीमागील महिनाभरात झालेली ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच लालू कांबळे यांना देखील या मार्गावर असणाऱ्या भल्यामोठ्या खड्यात गाडी जावून नियंत्रण गेल्याने डंपरखाली आल्याने जीव गमवावा लागला होता.

, , , , , , ,

One Response to पवई येथे अपघातात एका तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

  1. BGK September 5, 2025 at 4:40 pm #

    अतिशय दु:खद घटना. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यांची स्थिती दयनीय आणि हालाखीची आहे. सरकार कोणाचेही असो सामान्य माणसाची किंमत कुणासही नाही. जनता बिचारी सोसत राहणार … विचार करा आज ज्याचा अपघातात जीव गेला त्याच्या घरी आज गणपतीच्या सणात काय परिस्थिती असेल. त्यांचे दु:ख कसे सरणार ?? कालच कोकण वासी २२ -२४ तास प्रवास करून मुंबईत परतले त्यांचे वाईट अनुभव हा दरवर्षीचाच भाग बनलाय. कोणाला फिकीर नाही , इच्छाच नाही हो रस्ते सुधरण्याची. फक्त तात्पुरती मलम पट्टी करतात आणि भागवतात. आपल्या चांदिवलीच्या मुख्य प्रवेश चौकात पहा किती खडे पडलेत , इमारत क्रमांक १ समोरचा रस्ता

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!