गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! गर्जनेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत भावपूर्ण आणि जड अंतकरणाने पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर आणि पवई, चांदिवली येथील कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले.
मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा झाला. ११ दिवस पाहुणचार घेतल्यानंतर शनिवारी वाजत-गाजत बाप्पांनी आपल्या भक्तांचा निरोप घेतला.
पवई तलाव मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर (पंचकुटीर) गणेशघाट अशा दोन ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. सोबतच पवई आणि चांदिवलीत संघर्षनगर येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते.
विसर्जनाची काही छायाचित्रे –









माझा बाप्पा: श्री. नवनाथ मोरे, पवई यांच्या घरचे गौरी गणपती



No comments yet.