पवई येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३,४३,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच ते सव्वासात या अवघ्या अडीच तासांच्या कालावधीत घडली. तक्रारदार लक्ष्मी कोडते (वय ३९) या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्या टाटा पॉवर ट्रान्झिट […]


















