जेविएलआरवर सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडले

आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना एका सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. अतुल खरोसे असे या घटनेत मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला अटक केली आहे.

कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए कॉलनीत राहणारे अतुल खरोसे हे पवई येथील एल अँड टी भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करत. शनिवार, २५ मे रोजी त्यांना सुट्टी होती, मात्र त्या दिवशी कामावर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नाईट शिफ्टसाठी ते आपली मोटारसायकल क्रमांक एमएच ०४ एलजी ३७१४ वरून संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले.

“ते जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून पवई प्लाझा सिग्नल येथे पोहचले असताना अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी या मार्गावरून जात असणाऱ्या डंपर क्रमांक एमएच ०३ ईजी १९५९ च्या डाव्या बाजूच्या पाठीमागील भागास धडकून ते पाठीमागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले.” असे पवई पोलिसांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्हाला माहिती मिळताच आम्ही गंभीर जखमी अतुल याना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले.’

या संदर्भात अतुल यांच्या पत्नी अलका खरोसे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पवई पोलिसांनी भादंवि कलम ३०४ (ए), ३३८, २७९ सह मोटार वाहन कायदा कलम १३४ सी (अ) (ब) नुसार गुन्हा नोंद करून, आरोपी डंपर चालक रमजान रझाक नदाफ (३३) याला अटक केली आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!