‘फु’काचे सल्ले

प्रसाद वाघ (परीस)

डॉक्टर म्हणतायत तुम्ही नावचेच वाघ; शिकारीला लागा ‘ब १२’ नावाचे विट्यामीन कमी पडतय. जनावरं मारुन खायला शिका आता. म्हणल ‘ब’ आणि ‘बारा’ यांच्याशी गुणीले तीन छत्तीसचा आकडा आहे. त्यात शुद्ध शाकाहारी, जनावरे कशी खाऊ? म्हणले मग गोळ्या खा डबाभरुन बी कॉंप्लेक्सच्या. रोज किलोभर चीज खात जा.

म्हणलं अय येड्या. वजन अव्वाच्या सव्वा वाढेल. म्हणतो कसा, जीमीत जा. वायामशाळा.

जिस गली मे हो तेरा घर बालमा उधरसे हम जातेच नै. आयुष्यात पहिल्यांदा जिमित गेलतो तेंव्हा जिममास्तर म्हणला काढ दहा उठाबश्या. मी म्हणलो येत नाहीत. त्याने दणदणीत २० उठाबश्या काढल्या. मी म्हणलो व्हेरीगुड्डच. माझ्या नावच्या पण रोज २०० काढत जा. मी रोख पैसे देतो. वैतागून म्हणला अस चालत नसतय. म्हणल का चालत नाही?

अभिषेकाची पावती फाडतोय की. पुजारी आपल्या नावानी अभिषेक मारतो. देवबाप्पा फुल्टू खिश्यात. तस तुझी पावती फाडतो रोज २०० बैठका घाल. माझं वजन कमी झालच पाहिजे. धरली न त्याने गचांडी. मी हलतोय हलत नसतोय जागेवरुन. म्हणला पाया पडतो जा बाबा. त्याची पद्मीनी कोल्हापुरे झाली. ये गलीया ये चौबारा.. यहा आना ना दौबारा..

त्या डॉक्टरला म्हणालो अरे रोजच्या पोळीभाजीतली काहीतरी ऑर्डर दे. निदान खिचडीमधे तरी ब बाराचा नवा आयटम सांग. तर म्हणला अंडी खा. मी म्हणालो भ्रूणहत्येची केसच टाकतो तुझ्यावर. लै छळल तासभर. तो डॉक्टर सध्यातरी दवाखान्याला दुसरीकडे नवीन जागा शोधतोय.

देवबाप्पा देवबाप्पा मला पाव (बे.न्ह.)..

ब १२च झाड माझ्या अंगणात लाव..

(बे.न्ह. = बेकरीतला न्हवे)

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!