पवईजवळ गांधीनगर येथे काल रात्री मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ओला कारला अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. विक्रोळी अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी वायरिंगमध्ये शोर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काल, बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास पवईकडून – मुलुंडच्या दिशेने जात असताना गांधीनगर येथे ओला या प्रवासी वाहतूक कंपनीसाठी काम करणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारच्या पुढील भागातून धूर निघत असल्याचे त्याच्या चालकाला जाणवले. काही क्षणातच गाडीच्या पुढील भागाने आग पकडत काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला.
विक्रोळी अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी दाखल होत २ बंबांच्या साहय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. गाडीत यावेळी कोणीच प्रवासी नसल्याने आणि चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
गाडीला लागलेल्या आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायर शोर्ट होऊन आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे पार्कसाईट पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.