साकीनाका पोलिसांच्या हद्दीत कार्यालय असणाऱ्या ड्रायफ्रूट कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातील सर्व्हर हॅक करून भामट्यांनी ऑनलाइन घुसखोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही प्रणाली पूर्ववत करण्यासाठी या भामट्यांनी कंपनीकडे चक्क बिटकॉइनसची मागणी केली आहे.
ऑनलाईन गुन्हेगारी हे सध्याच्या गुन्हेगारी जगतातील लोकांचे खूप मोठे हत्यार बनून राहिलेले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात वैयक्तिक रित्या उपस्थित न-राहता हे गुन्हे करता येत असल्यामुळे, एकेकाळी निरक्षर, कमी शिक्षण असणाऱ्या लोकांची मक्तेदारी असण्याची बोलले जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता शिक्षित आणि तांत्रिकद्दृष्ट्या माहिती असणाऱ्या गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. एका-पेक्षा-एक गुन्ह्याच्या पध्दती ऑनलाईन गुन्हेगारीत दररोज समोर येत आहेत. साकीनाका पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या एका कंपनीला अशाच प्रकारच्या एक नवीन गुन्हे प्रकारचा सध्या अनुभव आला आहे.
ड्रायफ्रूट बनवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला त्यांच्या साकीनाका येथील कार्यालयाने फोन करून ऑफिसचा सर्व्हर चालत नसल्याची माहिती दिली होती. याबाबत कार्यालय गाठून त्यांनी तपासणी केली असता, मुंबई सोबतच पुणे येथील मुख्यालयामध्येही असेच होत असल्याचे त्यांच्या समोर आले.
टेक्निकल व्यक्तीकडून तपासणी करून माहिती प्राप्त करून घेत सर्व्हर हॅक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वांद्रे पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंद करून तो साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सर्व्हर प्रणाली पूर्ववत करून हवी असल्यास बिटकॉइन द्यावे लागतील अशी मागणी याला हॅक करणाऱ्यांनी केल्यामुळे केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशानेच सर्व्हर हॅक झाल्याचे उघड झाले आहे.
पोलिस या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेत आहे.
No comments yet.