एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई गणेश कट्टे यांनी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे.
आयआयटी पवई येथील झुरी कंपाऊंड भागात राहणारे निलेश नागे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नीला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने डॉक्टरांनी रक्त चढवावे लागणार असून, रक्ताची सोय करण्याची सूचना केली होती.
नागे यांनी आपल्या मित्रांना याबाबत माहिती देवून कुठे रक्ताची सोय होते का? पाहण्यास सांगितले होते. रक्ताची शोधाशोध सुरु असतानाच नागेंचा मित्र राकेश याने पवई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आयआयटी चौकीत पोलीस अंमलदार म्हणून कर्तव्यावर असणारे गणेश कट्टे यांची भेट घेवून काही मदत होईल का? अशी विचारणा केली.
“त्यांनी मला विचारले कोणत्या गटाचे रक्त हवे? तेव्हा मी त्यांना ‘बी पॉजिटीव्ह’ असे सांगताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न-लावता मला गाडीवर बसायला सांगून, ते मला रुग्णालयात घेवून आले. स्वतः आपण त्या रक्तगटाचे आहोत असे सांगून, रक्तदान केले” असे याबाबत बोलताना नागे यांनी सांगितले.
“ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी रुग्णाची असणारी अवस्था मला सांगितली. माझा रक्तगट आणि आवश्यकता असणाऱ्या रक्ताचा गट हा एकच आहे हे माहिती पडल्यावर, वेळ दवडत बसण्यापेक्षा मी स्वतः जावून रक्तदान करणे मला योग्य वाटले. वर्दीत असताना पोलीस ही जरी आमची ओळख असली तरी, त्याच्या आतमध्ये आम्ही माणूसच असतो. माणूस म्हणून माझी जी सामाजिक बांधिलकी आहे, तो जपण्याचा मी प्रयत्न केला आहे. बस्स!”, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पोलीस शिपाई गणेश कट्टे यांनी सांगितले.
कट्टे यांनी कायदा सुव्यवस्थेचे कर्तव्य बजावतानाच माणूस म्हणून असणारे आपले कर्तव्य तेवढ्याच सामाजिक बांधिलकीने पार पाडल्याने त्यांच्यावर पवईकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Great
Great Sir
Nice work major
Jay hind
Super
Sir proud of you Jai Hind
Katte saheb ekdum bhari.
Very Nice
Mast
खुप छान मित्रा …..Great
Kharch manapasun.??
mast ganesh saheba
Nice one sir
Nice
जय हिंद
Salutes to Mr Katte.
Nice officer great work
मी निलेश नसते
कट्टे साहेबांनी रक्त दिले पण
त्यांनी लिहिलेली स्टोरी चुकीची आहे
माझी पत्नी हि २३/०३/२०१८ लाच हिरानंदनी hospital. मध्ये ऍडमिट होती आणि मला रक्त. रिपलेसमेंट मध्ये रिर्टन करायचे होते
म्हणून मि माझ्या मित्रांना फोन केला त्यामधील एक मित्र संतोष याने सांगितले माझ्याकडे एक व्यक्ती आहे मला माहिती पण नव्हते हि ती व्यक्ती असेल मी त्यांचा आभारी आहे त्यांनी ब्लड देऊन एक चांगले काम केले पण मला खूप वाट वाटतं कि माझ्या व माझ्या पत्नी बद्दल चुकीची माहिती fb. वर दिली
Nice
Nice ji.
Nice ji…
Good job
Grate job sir
Nice
Always suppotive. .. khakitla asli manus