वसंथा मेमोरियल कॅन्सर सेंटर, मुंबईने अजून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. केंद्रात महिलांसाठी केल्या जाणाऱ्या गर्भाशय ग्रीवांच्या स्क्रिनिंगने १००० महिलांच्या तपासणीचा टप्पा पार केला आहे. १५ जून २०१९ रोजी विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट भागात सुरु करण्यात आलेल्या वसंथा मेमोरियल च्या नवीन केंद्राचे उद्घाटन झाल्यापासून ट्रस्ट या भागात महिलांमधील कर्करोग जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. या केंद्रात चालवल्या जाणाऱ्या महिला क्लिनिकमध्ये आठवड्यातून तीनदा डॉक्टरांमार्फत मोफत सल्ला दिला जातो.
पाठीमागील आठ महिन्यांत प्रत्येक तपासणीच्या दिवशी सरासरी सुमारे १० ते १२ महिलांची तपासणी केली जात आहे. स्क्रीनिंगबरोबरच महिलांना स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची चिन्हे व लक्षणांवरही प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित स्वयंसेवकांकडून स्वत:ची तपासणी करण्याची पद्दत देखील शिकवली जाते. आज महिला सर्वसाधारणपणे परीक्षा व सल्ला घेण्यासाठी केंद्राकडे येत असल्याचे आढळून आले आहे.
आज महिलांमध्ये असणारी जनजागृती आणि पार करण्यात आलेल्या या टप्प्यासाठी येथे भेट देणारे डॉक्टर, कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या एकत्रित प्रयत्नांचे श्रेय आहे. या सर्वांनी आपला मौल्यवान वेळ तर दिलाच शिवाय तपासणी व आवश्यक तेथे उपचार करण्यात मदत केली. याबद्दल ट्रस्टने त्या डॉक्टरांचे आणि सहकार्याचे आभार मानले. अतिशय नाममात्र दराने प्रयोगशाळा सेवा, ऑटो क्लीव्हिंग सेवा इत्यादी प्रदान करणाऱ्यांचे सुद्धा संस्थेने यावेळी आभार मानले.
संस्था केवळ एका ठिकाणावरून कार्यरत न-राहता येथील कर्मचारी आणि स्वयंसेवक महिलांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्क्रीनिंगच्या वेळी मार्गदर्शन करून क्लिनिकमध्ये जाण्यास मदत करत असतात. केंद्रातील स्क्रिनिंगशिवाय ट्रस्ट शहराच्या विविध भागातील केंद्राबाहेर इतर संस्था व एनजीओएसच्या स्क्रीनिंग कॅम्पमध्येही भाग घेते. बाहेरील शिबिरे महिन्यातून एकदा तरी घेतली जातात. ट्रस्टने चांगले काम सुरू ठेवण्याची आणि कर्करोगमुक्त भारत या अभियानाच्या दिशेने पुढे जाण्याची अपेक्षा ठेवली आहे.
No comments yet.