५व्या नॅशनल मास्टर गेम्समध्ये राजेंद्र जाधव यांना सुवर्ण

वाराणसी उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या ५व्या नॅशनल मास्टर गेम्समध्ये १० मीटर एअर रायफल (

वाराणसी उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या ५व्या नॅशनल मास्टर गेम्समध्ये १० मीटर एअर रायफल (Peep Sight) या प्रकारामध्ये पवईकर राजेंद्र जाधव यांनी अचूक भेद घेत गोल्ड मिळवले आहे. काशी विश्व हिंदू विद्यालयाच्या, आयआयटी मैदानावर हे सामने पार पडले. उत्तरप्रदेश मास्टर्स गेम्स असोसिएशनतर्फे ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या स्पर्धेत जाधव यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

विविध राज्यातील ४०० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. १० मीटर एअर रायफल (Peep Sight) या प्रकारामध्ये स्पर्धकांमध्ये झालेल्या स्पर्धेत जाधव यांनी अचूक लक्ष भेदत स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

पाठीमागील वर्षी केरळ (ञिवेद्रम) येथे पार पडलेल्या चौथ्या नॅशनल मास्टर स्पर्धेमध्ये १०मिटर एअर रायफल शूटिंग (पीप साईट) या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवत त्यांनी भारतात प्रथम क्रमांक पटकावला होता. आता यावर्षी ही प्रथा कायम ठेवत त्यांनी ५व्या नॅशनल मास्टर स्पर्धेमध्ये अचूक नेमबाजी करत पुन्हा एकदा सुवर्ण पदक आपले केले आहे.

जाधव हे विविध सांघिक व वैयक्तिक खेळात नेहमीच सहभाग घेत आले आहेत. रायफल शुटींग खेळात त्यांना अधिक रस असल्याने ते याबाबत पाठीमागील वर्षभरापासून प्रशिक्षण घेत, सराव करत आहेत.

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर काहीही करता येते, त्याला वयाचे बंधन कधीच नसते हेच जाधव यांच्या यशातून वेळोवेळी समोर येत आहे.

,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!