पवईतील आयआयटी येथे आदिशंकराचार्य मार्गवर मलनिसारण वाहिनीचे काम सुरु असताना क्रेनचा भाग कोसळून तिथे काम करणाऱ्या

बचाव कार्यानंतर अग्निशमन अधिकारी
३ कामगारांचा मृत्यू झाल्याची आणि २ कामगार जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रामेश्वर समय (४०), सत्यनारायण सिंग (४०), रामनाथ सिंग (३८), विश्वनाथ सिंग (४५) आणि परेश सिंग (४२) अशी घटनेतील जखमींची नावे आहेत.
गेल्या वर्षभरापासून पवईतील आदि शंकराचार्य मार्गावर पंचकुटीर ते गांधीनगर या पट्यात विविध टप्यात मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. या मार्गावरील आयआयटी भागात वाहिनेचे काम सुरु असताना आज संध्याकाळी येथे काम करत असणाऱ्या क्रेनचा हुकासह भाग तुटून कोसळून ५ कामगार गंभीर रित्या जखमी झाले.

अग्निशमन अधिकारी, पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलिस ठाणे) फोपळे यांच्याशी घटनेबाबत चर्चा करताना
अग्निशमन दल आणि पवई पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
“एक ४० फुटी खड्डा खोदून त्याच्याद्वारे सुरुंग माध्यमातून वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. आज संध्याकाळी हे काम सुरु असतानाच क्रेनची साखळी तुटून ही दुर्घटना घडली आहे. राजावाडी रुग्णालयात ५ जखमींना दाखल करण्यात आले आहे, ज्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. रामनाथ आणि परेश नाथ सिंग नामक दोन जखमी असल्याचे राजावाडी रुग्णालयाने माहिती दिली असून, मृतांची नावे अजून स्पष्ट झाली नाही आहेत.” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
फोटो सहित बातम्यांची मांडणी छान करता..फोटोमुळे बातमीत जीव येतो ..आपणाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद