रामबाग येथील पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी रूमचे नूतनीकरण रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सतर्फे नुकतेच करण्यात आले आहे. शुक्रवारी रोटरी क्लब ऑफ मुंबईचे डिस्ट्रीक गव्हर्नर डॉ राजेंद्र अग्रवाल, रोटरी लेकर्स अध्यक्ष निमिष अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते या रूमचे उद्घाटन पार पडले.
यावेळी सिटीझन्स ऑफ पवईचे संजय तिवारी, रोटरी क्लबचे हनुमान त्रिपाठी, दिपक दर्यानानी, प्रिया मोहन, हरीश अय्यर पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत, पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील सह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुंबई पोलीस अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. मात्र त्यांची काम करण्याची वेळ आणि जागेची स्थिती यामुळे त्यांना काम करणे अवघड होत असते. त्यांना काम करण्यासाठी योग्य पोषक वातावरण मिळावे म्हणून रोटरी क्लब पुढे सरसावले आहे. जानेवारी महिन्यात याआधी रोटरी क्लब ऑफ मुंबईतर्फे पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकारी रूमचे नूतनीकरण करून त्यांना सुपूर्द केले होते. आता रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सतर्फे अजून एका अधिकारी रूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
सिटीझन्स ऑफ पवईचे संजय तिवारी यांनी रोटरी क्लबकडे यासाठी पाठपुरावा करत पोलिसांच्या या रुमच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यांच्या पुढाकाराने जानेवारी महिन्यात पहिल्या तर २५ फेब्रुवारीला दुसऱ्या अधिकारी रूमचे उद्घाटन करत या रूम पवई पोलिसांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
“पोलीस प्रशासन आपल्या सेवेत सतत कार्यरत असते तेव्हा आपलेही त्यांच्यासाठी कर्तव्य आहे कि, त्यांना कामासाठी एक चांगली जागा मिळायला हवी. नागरिकांसाठी सदैव काम करणाऱ्या सर्व विभागांना आवश्यक सुविधा मिळाव्या यासाठी रोटरी क्लब नेहमीच प्रयत्नशील असणार आहे,” असे यावेळी बोलताना अग्रवाल म्हणाले.
No comments yet.