चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
