शाळा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात असणारे बेकायदेशीर फेरीवाले आणि पानटपरीवर पवई पोलीस ठाणे तसेच महानगरपालिका यांच्याकडून मंगळवारी, २४ डिसेंबरला तडकाफडकी कारवाई करण्यात आली. शाळा महाविद्यालय परिसर पवईत गेल्या कित्येक वर्षापासून बेकायदेशीर फेरीवाले तसेच पानटपरींचे साम्राज्य राजरोसपणे वाढत चालले होते. हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार पालिका आणि पवई पोलीस यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने […]