Tag Archives | Hiranandani

Kids masti

तापमान कमाल, बच्चेकंपनीची धमाल ..!

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून, मुंबईकर आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळत आहेत. जावेच लागले तर पुरेशी काळजी घेताना दिसतात. उन्हाच्या कडाक्यात स्वतःला वाचवण्यासाठी जिकडे तरुण मंडळी विविध कॉस्मेटीक प्रोडक्ट्सचा वापर करताना आढळून येत असतानाच, पवईतील बच्चेकंपनीने मात्र या उन्हाच्या तडाख्याला न-जुमानता धमाल-मस्ती करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे. पवई, हिरानंदानी येथील चंद्रभान शर्मा चौकात […]

Continue Reading 0
housemaid Shinde

मोस्ट वॉन्टेड मोलकरणीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईतील लेकहोम आणि हिरानंदानी येथील व्यावसायिकांच्या घरात घरकामाची नोकरी मिळवून, २४ तासाच्या आत घर साफ करून गायब झालेल्या ३५ वर्षीय मोस्ट वॉन्टेड मोलकरणीला पवई पोलिसांनी दीड वर्षाच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी अटक केली आहे. भारती शिंदे उर्फ कविता जाधव असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. डिसेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ रोजी पवईतील दोन व्यावसायिकांच्या घरात […]

Continue Reading 0
SUV-stolen-from-hiranandani

हिरानंदानीमधून ३५ लाखाची महागडी एसयुव्ही घेवून पळून गेलेल्या आरोपीला अटक

पवई हिरानंदानी येथील ओडिसी इमारतीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाची ३५ लाखाची महागडी कार चोरून पसार झालेल्या चोरट्याला त्याच्या साथीदारासह पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकाने गाडी साफ करण्यासाठी पाठवले असल्याचा बहाणा करून चावी घेवून त्याने कार इमारतीच्या पार्किंगमधून पळवून नेली होती. शिवाजी भाऊ झोरे आणि प्रदीप भागोजी गावडे अशी अटक करण्यात […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

महिलेच्या विनयभंग प्रकरणी पळून गेलेल्या चौघांना अटक

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील फुटपाथ ब्रिज वर एका महिलेशी अश्शील वर्तन करत, याचा जाब विचारणाऱ्या भावाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी पळून गेलेल्या चार आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंड परिसरात राहणारी तक्रारदार महिला रविवारी सायंकाळी हिरानंदानी येथील मदिरा अंड माईस रेस्टोरंट मध्ये तिच्या भाऊ व मैत्रिणी सोबत जेवणासाठी आली […]

Continue Reading 0
phishing

आयआयटीकराच्या बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला

आयआयटी पवई भागात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाच्या खात्यातील पैसे चोरट्याने ऑनलाईन लांबवल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या तरुणाला ही बाब लक्षात येताच त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवई येथील आयआयटी परिसरात राहणारे अविनाश आगळे, आयआयटी मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. इंडियन ओव्हर्सीस बँकेच्या पवई प्लाझा […]

Continue Reading 0
fire avalon b wing 14th floor

हिरानंदानी, एवेलॉन इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग

हिरानंदानी येथील एवेलॉन इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असणाऱ्या १४०२ फ्लॅटमध्ये शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ७.४५ वाजता घडली. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही. यासंदर्भात घटनास्थळी पोहचलेल्या पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी येथील एवेलॉन इमारत, ‘बी’ विंगच्या चौदाव्या […]

Continue Reading 0
dr l h hiranandani garden

पालिका उद्यानाला पद्मभूषण डॉ एल एच हिरानंदानी यांचे नाव देण्याची मागणी

@अविनाश हजारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये देशात आपले अढळ स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध ई एन टी स्पेशालिस्ट, सर्जन पद्मभूषण दिवंगत डॉ एल एच उपाख्य लखूमल हिरानंद हिरानंदानी यांचे नाव पवईतील, हिरानंदानी येथील हेरिटेज जवळील पालिका उद्यानाला देण्याची मागणी आई जिजाऊ बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. थत्ता, सिंध येथे जन्मलेले डॉ हिरानंदानी यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावीच […]

Continue Reading 0
nirvana park

निर्वाणा पार्क आता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान

पवईतील सर्वांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या निर्वाणा पार्कचे आज (बुधवार, १६ जानेवारी) नामकरण करण्यात आले असून, आता हे उद्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, महानगरपालिका ‘एस’ उद्यान विभागाच्या म्हात्रे मॅडम आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम पार पडला. पवई म्हटले कि, पर्यटन प्रेमींच्या आकर्षणाचे […]

Continue Reading 0
suicide death

विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापक विरोधात गुन्हा दाखल

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मध्ये शिक्षण घेणाऱ्या रामबाग येथील संकेत तांबे प्राध्यापकांच्या अपमानास्पद बोलण्यानंतर निराशेत असताना सोमवारी आत्महत्या केल्यानंतर पवई पोलिसांनी प्राध्यापकाला समन्स पाठवले आहेत. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवईतील रामबाग येथे राहणारा संकेत तांबे टीसमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याने तिथे जाणे बंद केले होते. याबाबत पालकांनी विचारणा केली […]

Continue Reading 0
suicide

मानसिक तणावातून पवईत दोन तरुणांची आत्महत्या

मानसिक त्रासाला कंटाळून पवईतील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना पाठीमागील दोन दिवसात घडल्या आहेत. पवईतील कॉस्मोपॉलिटिन इमारतीत राहणारा संकेत तांबे याने सोमवारी राहत्या इमारतीच्या ८ मजल्यावरील रीफ्युजी एरियातून उडी मारून आत्महत्या केली. तर फिल्टरपाडा येथे राहणारा तरुण ओम बाली (१८) याने कांजुरमार्ग येथे लोकलखाली आत्महत्या केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा हुशार विद्यार्थी होता. […]

Continue Reading 0
cartoon

विना हेल्मेट जाताना तरुणांना अडवणाऱ्या पोलिसाला तरुणाच्या वडिलांकडून मारहाण; तिघांना अटक

हेल्मेटशिवाय फिरत असणाऱ्या १९ वर्षीय तरुण बाईकर, त्याच्या मित्राला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पवईत घडली. एलएन्डटी येथे पोलिसांनी विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांच्यावर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. तिघा आरोपीना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक करून पवई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तिथे ही धिंगाणा घातला. नशेत गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना […]

Continue Reading 0
2

हिरानंदानीत बिजनेस पार्कच्या मिटर रूमला आग, अग्निशमन अधिकारी जखमी

पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!