विद्यार्थ्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून, ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पोर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना […]
Tag Archives | Powai English High school
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते. महाभारत, पुराणे ज्यांनी लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा मंगलदिन म्हणजे गुरुपौर्णिमा. याला व्यासपौर्णिमा असे सुद्धा संबोधले जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. देशभर हा दिवस आपल्या गुरूला स्मरून त्यांच्या आदरार्थ साजरा केला जातो. मुलांनो आपल्या जीवनातील गुरुचे महत्व जाणा, असे […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
तरुण पिढीला सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण, तरुणी त्याच्या आहारी गेली आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा नवीन नाहीत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य; एक वाकडे पाऊल आयुष्य कसे उध्वस्त करू शकते याची जाणीव करून देण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून, “जागतिक अंमली पदार्थ […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये रंगली पालकांची ‘फ्लॅग मेकिंग’ स्पर्धा
पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यांना बघूनच मुले त्यांचे अनुकरण करत असतात, ही बाब लक्षात घेत पवई इंग्लिश हायस्कूलतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत फ्लॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर आणि महिला उद्योजिका सुनिता विनोद यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्वातंत्र्य दिवस म्हटले की प्रत्येक शाळेत रंगतात त्या म्हणजे […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती’ आणि ‘पोलीस दीदी’
@प्रमोद चव्हाण तरुण पिढीला सध्या सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण मुले-मुली त्याच्या आहारी गेल्याचे समोर येत असते. सोबतच लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा दिवसेंदिवस डोके वर काढत आहेत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य, एक वाकडे पाऊल कुठल्या कुठे घेवून जावू शकते याची माहिती करून देण्यासोबत कायदे योग्य […]
दहावी परीक्षेत पवईच्या विद्यार्थ्यांची भरारी
@प्रमोद चव्हाण पवईतील अनेक विद्यार्थी शैक्षणिक करिअरच्या स्तरावर पदार्पण करत आहेत. मार्चमध्ये झालेल्या एसएससी (दहावी) परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांनी ९७% पेक्षा अधिक गुण मिळवून त्यांचे कुटुंब आणि शाळा दोघांना गौरव मिळवून दिला आहे. आम्ही पवईंच्या शाळांमधील समृद्ध मिश्रणाचा थोडक्यात घेतलेला आढावा. एस एम शेट्टी हायस्कूल व कनिष्ठ […]
चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले पवई इंग्लिश हायस्कूलचे स्नेहसंमेलन
@सुषमा चव्हाण आयआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन “रिफ्लेक्शन” मंगळवारी अय्यप्पा मंदिरा समोरील मोकळ्या मैदानात दणक्यात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती सुनितादेवी गोपाल शर्मा, सून सौदामिनी शर्मा व भारतीय सशस्त्र सेनेचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी […]
पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न
पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव यावर्षी ७ व ८ नोव्हेंबरला डॉकयार्ड मैदान, कांजुरमार्ग आणि शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्नल सुरी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार आणि पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन आणि […]
पवई इंग्लिश हायस्कुलला ‘सायन्स क्यूज’ स्पर्धेत द्वितीय पारितोषिक
आयआयटी, पवई येथील पवई इंग्लिश हायस्कुलने पाठीमागील आठवड्यात वार्ड पातळीवरील झालेल्या ‘सायन्स क्यूज’ स्पर्धेत दुसरे स्थान पटकावत आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. छायाचित्रात मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई सोबत स्पर्धक विद्यार्थी करण तांबोळी, साईमा कुरेशी आणि प्रमिला टिचर दिसत आहेत. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती
आ यआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये शुक्रवारी निव फौंडेशन आणि पवई इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबई विभागाचे गुप्तचर अधिकारी कुलभूषण सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला निव फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा कमलप्रित कौर, पवई इंग्लिश हायस्कूल माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका […]
अंध विद्यार्थ्यांसाठी मदतीचा ‘आवाज’
अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांच्या ‘आवाज’ उपक्रमास पवई इंग्लिश हायस्कूलच्या १९ विद्यार्थ्यांनी आपला आवाज देत त्यांच्या शिक्षणाट मोलाचा वाटा उचलला आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कविता आणि गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. अंधांमध्ये ‘दृष्टी’ नसली तरी ‘दृष्टिकोन’ असतो. एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा ते भरभरून बोलतात […]