अर्चना सोंडे
कोरोनाकाळात पोलीस बांधव २४ तास बंदोबस्तावर आहेत. कोरोनासोबत दोन हात करतानाच नागरिक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत आहेत की नाही हे देखील पाहत आहेत. आपल्या प्राणांची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ‘विनोद पाटील युवा फाऊंडेशन’तर्फे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कृतज्ञता अल्पोपहाराचे’ वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असणाऱ्या शेकडो पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या या लाटेत सुद्धा संपूर्ण पोलीस दल कोरोनाशी दोन हात करत आहे. त्यांचे हे सामाजिक ऋण न फिटणारे आहेत. “उन्हातान्हात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांप्रती आम्ही सामान्य नागरिक आपले ऋणी आहोत ही भावना पोहोचविण्यासाठी आम्ही ‘कृतज्ञता अल्पोपहार’ वाटपाचे आयोजन केले.” असे मनोगत युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केले.
आतापर्यंत २०० पोलिसांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले असून आणखी दोन दिवस हे वाटप करण्यात येईल असे देखील विनोद पाटील यांनी सांगितले.
यावेळी फाऊंडेशनचे संतोष शेट्टी आणि राहूल मेंगर उपस्थित होते.
No comments yet.