हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये पाण्याची टाकी पडून ७ कामगार जखमी, दोघांची स्थिती गंभीर

घटनास्थळ

ज सकाळी हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई येथील कामगार शिबिरात (लेबर कॅम्प) एक प्रचंड प्लास्टिकची पाण्याची टाकी पडून, सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना घडली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी खैरलाल अलाम (३५) याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी मजूर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असताना

जखमी कामगार जितेंद्र निषाद (२१), रुपचंद निषाद (२२) मोतीलाल सहानी (३१), वलेश्वर सहानी (४७), इनाउल हक (४०), शब्बीर (२७) यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका कामगाराची स्थिती गंभीर असल्याने त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. “जवळपास सोळा हजार लिटरच्या सिंटेक्सची पाण्याची टाकी संपूर्ण भरल्यानंतर पाणी बाहेर पडू लागले होते. पाण्याचा दबाव जास्त झाल्यामुळे टाकी पडून – फुटून ही घटना घडली.”

अजून एक अधिकाऱ्याने नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर सांगितले “विटा – सिमेंटच्या काट्यावर ही टाकी ठेवण्यात आली होती. वजन जास्त झाल्यामुळे कट्टा तुटून टाकी खाली पडली आणि आसपास अंघोळीसाठी, ब्रश करत उभे असणारे काही कामगार गंभीर जखमी झाले.

किरकोळ जखमी मजुरांवर राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर असणाऱ्या मजुरावर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळाची तपासणी करीत आहेत, तपासाअंती अधिक माहिती मिळू शकेल.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!