मानसिक तणावातून लेकहोम जवळील तलावात तरुणाची आत्महत्या, वाचवायला गेलेला भाऊही बुडाला

रिवारातील सदस्याच्या मृत्यूमुळे गेली अनेक महिने मानसिक तणावात असणाऱ्या तरुणाने लेकहोम जवळील तलावात आत्महत्या केल्याची घटना काल (मंगळवारी) रात्री चांदिवली परिसरात घडली. त्यास वाचवायला गेलेल्या त्याच्या मोठ्या भावाचाही यावेळी बुडून मृत्यू झाला आहे. अस्लम (२२) आणि आलम शेख (२५) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांनाही बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, राजावाडी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहणारे शेख यांचा मोठा परिवार आहे. कुटुंबातील एका मोठ्या मुलाचा काही महिन्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाला होता, ज्याचा धसका छोट्या मुलाने घेतल्यामुळे तो तेव्हापासून मानसिक तणावात होता. मंगळवारी याच तणावात त्याने राहत्या परिसराच्या समोरील बाजूला असणाऱ्या छोट्या तलावात उडी मारून आत्महत्या केली. यावेळी वाचवायला गेलेल्या दोन मोठ्या भावांपैकी जावेद हा कसाबसा त्या संकटातून बचावला, मात्र आलमचा बुडून मृत्यू झाला.

“जावेदने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि अग्निशमन दलाच्या साहय्याने आम्ही रात्री उशिरा बुडालेल्या दोघांना बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी राजावाडी येथे नेण्यात आले आहे. त्यांच्या परिवाराचा जवाब आम्ही नोंदवत आहोत”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!