कामाचा दर्जा सुमार असतानाही वीस वर्षापासून पवईत मनपाचा एकच ठेकेदार. हा योगायोग की गौडबंगाल – स्थानिक नागरिक
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागांतर्गत अनेक कामे हाती घेतली गेल्याचे बॅनर्स, पोस्टर्स गल्ली बोळात झळकवली जात असून, काही ठिकाणी तर चक्क उदघाट्नाचे नारळ फोडले सुद्धा जात आहेत. मात्र सत्ता कोणाचीही असो त्यानंतर प्रत्यक्षात कामे होताना काही दिसत नाहीत. जी कामे केली जात आहेत, त्यांचा दर्जा सुद्धा सुमार आहे. त्यातच कामाचा दर्जा सुमार असतानाही वीस वर्षापासून पवईत मनपाचा एकच ठेकेदार कसे काम करत आहेत. पालिकेकडे अशी कामे करणारा दुसरा कोणीच ठेकेदार नाही का? हा योगायोग समजावा की गौडबंगाल असा सवाल ही स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
येथील इंदिरानगर परिसरात सध्या लादीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्याचे काम करण्यास पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही केवळ थुकपट्टीचे काम करत कामाची पूर्तता केली जात आहे. ‘या परिसरात महानगरपालिकेने पाणी कपात केलेली आहे. पाणीची कमतरता असतानाही येथे काम चालू आहे. येथील घरा-घरातून पाणी मागून संबंधित (ठेकेदार) कामगार लादीकरणाचे काम करत आहेत. दगडी भूसा पाउडरमध्ये नाममात्र सिमेंट मिसळून लादीकरण केले जात आहे. असे काम किती काळ टिकणार? असे येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले ‘माझ्याच समोर कामगाराने एक सिमेंटच्या गोनीत चार वेळा दगडी भूसा पावडर मिसळून मलबा तयार केला आणि त्याच्या साहय्याने तीस ते चाळीस लाद्या बसवण्यात आल्या आहेत. याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने उद्धट उत्तर देत “हा फिर कितीना गोनी डालना चाहिए, महानगरपालिका मे काम ऐसा ही चलता है भाई, हम ऐसा ही काम करते है आप जाओ।” असे उत्तर दिले.’
काही कामे दाखवायला म्हणून केली जातायत ती ठीक आहेत, मात्र पाठीमागील सहा महिन्यात येथील अनेक कामांचे नारळ लोकप्रतिनिधींच्या हस्ते परिसरात फोडले गेले आहेत, परंतु त्या ठिकाणची कामे ना-आजतागायत सुरु झालीत ना – कधी सुरु होण्याची चिन्हे आहेत. शेवटी पवईकरांच्या नशिबी एकच गोष्ट अन ती म्हणजे “आश्वासनांचे नारळ आणि थुकपट्टीची कामे.”
Chor hai saale sab bathroom nahi baana paa rahe hai powai panchkutir ka 6mahine ho gaye
अधिक माहिती [email protected] वर पाठवावी. आम्ही त्याचा पाठपुरावा करू.
Ithe amhich chorala nivadaly tar pudhe kaay bolayche???
प्रत्येकाने पुढच्या वेळेस विचार करून आपले अमूल्य मत द्यायचे ! सध्या चांगल्या दर्जेदार कामासाठी स्थानिक पाठपुरावा करू शकतात.